Mapusa Municipal Council
Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council : म्हापसा नगराध्यक्षपदी प्रिया मिशाळ यांची बिनविरोध निवड

दैनिक गोमन्तक

म्हापसा नगराध्यक्ष पदासाठी आज (31 जानेवारी) निवडणूक पार पडली. नवीन नगराध्यक्ष म्हणून प्रिया मिशाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या पदासाठी मिशाळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.

यंदा महिलांसाठी राखीव जागा होत्या. (Mapusa Municipal Council)

विजयानंतर प्रिया मिशाळ यांनी आपले मत व्यक्त केले. आपल्या निवडीबद्दल सर्वांचे आभार मानले. भविष्यातील कामाच्या नियोजनाबाबत मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, कचऱ्याचा मुद्दा जो गहन बनला आहे, मी त्यावर काम करणार आहे. तसेच जी कामे रखडली आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणार असून, सर्व नगसेवक आणि आमदारांना विश्वासात घेऊनच ही सर्व कामे पार पाडणार आहे.

निवडणूक पार पडल्यानंतर उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी आपला राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याजागी उपनगराध्यक्षपदी विराज फडके यांच्या नेमणुकीचे संकेत वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT