Cortalim Jetty Canva
गोवा

Cortalim Jetty: जेटीचे खासगीकरण होऊ देणार नाही; काँग्रेसचा विरोध

South Goa Congress: जेटीचे खासगीकरण कुठ्ठाळी येथील लोकांचे किंवा गोव्यातील मच्छीमार समाजाच्या फायद्याचे नाही

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: कुठ्ठाळी जेटीच्या खासगीकरणाचा सरकारचा डाव आहे. या जेटीचे खासगीकरण कुठ्ठाळी येथील लोकांचे किंवा गोव्यातील मच्छीमार समाजाच्या फायद्याचे नाही. त्यासाठी या जेटीच्या खासगीकरणास काँग्रेस पूर्णपणे विरोध करणार व खासगीकरणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार, असे दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हा समितीचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा व कुठ्ठाळचे काँग्रेस नेते ओलेंसियो सिमॉईश यांनी आज मडगावात पत्रकार परिषदेत सांगितले.

आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्से यांनी मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना यासंदर्भात विचारले असता, कुठ्ठाळी जेटीच्या खासगीकरणास मंजुरी दिली त्यांनी सांगितले.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी या खासगीकरणाला विरोध करायला हवा होता, पण यासंदर्भात आपल्याला काहीच माहीत नसल्याचे आमदार भासवतात. जर त्यांना काहीच माहीत नसेल, तर त्यांनी हा प्रश्न राज्य सरकारकडे न्यायला पाहिजे. तसे होत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ओलेंसियो सिमोईश यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT