Goa News |Private Bus Service  Dainik Gomantak
गोवा

Goa Private Bus Owners: प्रतिलिटर 3 रुपयांचं अनुदान बंद केल्याने बसव्यवसाय परवडेना, जाणून घ्या समस्या

Private Bus Owners in Goa: सरकारने पूर्वीप्रमाणे डिझेलवर अनुदान सुरू केल्यास खासगी बसमालकांनी ज्या बसगाड्या बंद ठेवल्या आहेत त्या परत सुरू करणे काही प्रमाणात शक्य असल्याचे बसमालक मानुएल रॉड्रिग्स यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Private Bus Owners Demand Subsidy

सासष्टी: पूर्वी सरकार खासगी बसमालकांना डिझेलसाठी ३ रुपये प्रतिलिटर अनुदान देत असे. आता हे अनुदान बंद केल्याने खासगी बसमालकांना बस चालविणे कठीण होऊन बसले आहे. सरकारने पूर्वीप्रमाणे डिझेलवर अनुदान सुरू केल्यास खासगी बसमालकांनी ज्या बसगाड्या बंद ठेवल्या आहेत त्या परत सुरू करणे काही प्रमाणात शक्य असल्याचे बसमालक मानुएल रॉड्रिग्स यांनी सांगितले.

कदंबतर्फे पास पद्धत सुरू केल्याने मडगाव, सावर्डे तसेच आंतरमार्ग बसवाहतुकीवर परिणाम झाला आहे. कदंबची ‘माझी बस सेवा’ मडगाव, काणकोण, कुडचडे, सांगे येथे चांगल्याप्रकारे सुरू आहे. तरीही सरकारने कदंबमार्फत आणखी कमीत कमी ५० बसगाड्या या योजनेंतर्गत सामील कराव्यात, त्यामुळे सार्वजनिक बससेवेत थोडी सुधारणा होऊ शकेल, असेही मानुएल रॉड्रिग्स यांनी सांगितले.

बसमालक या नात्याने आम्ही प्रवाशांना सदैव चांगली सेवा देण्याचाच प्रयत्न करीत आहोत. कोविडनंतर कित्येकांनी आपल्या बसगाड्या विकल्या आहेत. हल्लीच मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक वाहतूक सेवेत वाढ करण्याची घोषणा केली होती. जर सरकारने आमच्या अल्प मागण्या मान्य केल्या तर सरकारला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. बसगाड्या रस्त्यावरून धावू लागल्या तर दुचाकी किंवा चारचाकी वाहने कमी होतील, असे रॉड्रिग्स यांनी सांगितले.

बसव्यवसाय परवडत नाही!

खासगी बस कंडक्टर मार्कुस बार्बोझा यांनी सांगितले की, सरकारने अनुदान बंद केल्याने बस व्यवसाय परवडत नाही. बसमालकांना डिझेल, रस्ता कर भरावा लागतो. चालक, कंडक्टर यांना पगार द्यावा लागतो. बस देखरेखीचा व मोडतोडीचा खर्च असतो. डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत.

कासावली-मडगाव बसगाड्या आहेत; पण प्रवासी मिळत नाहीत. आमची बिर्लामार्गे वाहतूक बंद केली आहे. शिवाय आम्हाला कदंब बसस्थानकापर्यंत यावे लागते. मडगाव शहरात जाता येत नाही, त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत व लोकांना ये-जा करण्यासाठी ३५-३५ मिळून ७० रुपये परवडत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT