Private bus owners' association warns of sit-in agitation
Private bus owners' association warns of sit-in agitation 
गोवा

खाजगी प्रवासी बस मालक संघटनेचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी - कोरोना महामारीच्या काळात खासगी बस सेवा बंद असताना सरकारने कदंब वाहतूक मंडळाची सेवा सुरू केली होती. खासगी बस मार्गावर काही कदंब बससेवा सुरू केली ती अजूनही मागे घेतलेली नाही. त्यामुळे कदंब व खासगी बसेसच्या वेळापत्रकात समस्या निर्माण झाली आहे. येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक संचालकांनी तोडगा न काढल्यास २३ नोव्हेंबरला त्यांना घेराव घालण्यात येईल. जर ते कार्यालयात अनुपस्थित राहिल्यास बस मालक संघटना आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा नेण्याचा ईशारा दिला आहे. त्यांनीही भेटण्यास टाळाटाळ केल्यास निवासस्थानासमोरच ठाण मांडण्यात येईल असा इशारा अखिल गोवा खाजगी प्रवासी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप तम्हणकर यांनी दिली. 

कोराना महामारीच्या टाळेबंदीवेळी राज्यात खाजगी बस वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी व रस्ता कर शुल्क एका वर्षासाठी लागू न करण्याची मागणी अखिल गोवा खाजगी प्रवास बस मालक संघटनेने केली होती व आठ दिवसांची मुदत दिली होती. मुदत उलटून गेल्यावरही सरकारने कोणताच निर्णय घेतला नसल्याने संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे. या याचिकेवर १८ नोव्हेंबरला गोवा खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT