Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा मोठा अपघात, भरधाव वेगात टायर फुटला अन्...

टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी खासगी बसचा टायर फुटून महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ) चांडवे गावाच्या हद्दीत मध्यरात्री पावणे 03 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात बसमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

टायर फुटल्याने चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई - गोवा महामार्गावरील चांदवे गावाजवळ रत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी लक्झरी बसचा अचानक टायर फुटला. यानंतर बस अनियंत्रितपणे उलटली. अपघाताच्या वेळी या बसमध्ये 22 प्रवासी होते. यातील 7 प्रवासी जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना महाडच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे.

बस चालकाविरुद्ध भा.द.वी. कलम 279, 337, 338 सह मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने खासगी बसच्या चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

(Seven Injured In Bus Accident On Mumbai Goa Highway)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अरेरे! रेड कार्पेटवर पाकिस्तानी उपपंतप्रधान तोंडावर पडले, सुरक्षारक्षकांनी कसंबसं सावरलं; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Viral Video: हत्तीने कारला खेळण्यासारखं हवेत उडवलं, ड्रायव्हर थोडक्यात बचावला; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी शब्बीर अहमद लोन अटकेत, रचला होता मोठा कट

Viral Post: "शेर कभी शिकार करना नहीं भूलता!" रोहितच्या वादळी खेळीवर युवीची प्रतिक्रिया; पोस्ट होतेय व्हायरल

VIDEO: होली स्पिरीट चर्चमध्ये 'पाम संडे' उत्साहात! पवित्र आठवड्याला प्रारंभ

SCROLL FOR NEXT