Colvale Central Jail Dainik Gomnatak
गोवा

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह पुन्हा चर्चेत, आता चिकनवरुन कैद्यांत हाणामारी

कोलवाळ कारागृह नेहमीच या ना त्या करणाने चर्चेत असते.

Pramod Yadav

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृह नेहमीच या ना त्या करणाने चर्चेत असते. कारगृहात कधी मोबाईल, अमली पदार्थ याबाबत कारवाई केली जाते तर, कधी विविध कारणांवरुन कैद्यांमध्ये मारहाणीच्या घटना घडतात.

अशीच एक घटना कारागृहातून समोर आली असून, यावेळी चिकनच्या कारणावरून कैद्यांमध्ये हाणामारी झालीय. यात काही कैद्यांना दुखापत झाली आहे. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिकन वाढण्यास नकार दिल्याने कोलवाळ कारागृहात काही कैदी भिडले, यात कैद्यांना दुखापत झाली आहे. जखमींमध्ये सादिक शेख, इस्माईल मुल्ला, मुस्तफा शेख आणि इतर कैद्यांना दुखापत झाली आहे.

कारागृहात रात्रीच्या भोजणात चिकन देण्यात आले, कैदी सादिककडे चिकन वाढण्याची जबाबदारी होती. चिकन वाढत असताना कैदी इस्माईल याने जास्त चिकन पाहिजे म्हणून ताट पुढे केले. पण, सादिकने चिकन देण्यास नकार दिला.

चिकन देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये मोठा वाद झाला. प्रकरण हाणामारीवर आले. त्यानंतर इतर दोघांच्या मदतीला आलेल्या कैद्यांमध्ये दोन गट पडल्याने वाद वाढत गेला.

दरम्यान, कारागृह कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला पण, यात अनेक कैदी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT