MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

पावसाळ्यापूर्वी बंधारे दुरुस्तीला प्राधान्य: कार्लुस फेरेरा

पुनोळा, कालवी, खोर्जुवे, मयडेतील बंधाऱ्यांची अधिकाऱ्यांसह पाहणी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: हानी झालेल्या बंधाऱ्यांमुळे शेतात पाणी घुसते आणि शेतकऱ्यांना दरवर्षी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित अभियंत्यांकडून अंदाजपत्रक तयार केले जाईल, असे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा सांगितले. दीर्घकालीन उपाययोजनांचा एक भाग म्हणून, ही कामे प्राधान्याने हाती घेण्याचा प्रस्ताव आहे,असेही ते म्हणाले.

आमदार फेरेरा यांनी कृषी आणि जलस्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांसह पुनोळा, कालवी, खोर्जुवे, मयडे येथील बंधारे आणि जलस्रोतांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने त्यांनी मतदारसंघातील विविध भागांना भेटी दिल्या होत्या. यासंदर्भात बोलताना आमदार फेरेरा म्हणाले, की बंधाऱ्यांचे हाम हाती घेणे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. अनेक उत्साही शेतकरी स्वत:च्या शेतात पीक घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, बंधारे फुटल्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करण्याला आपण प्राधान्य देणार आहे,असेही फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT