Narendra Modi Dainik Gomanatk
गोवा

पंतप्रधान मोदींची रविवारी उत्तर गोव्यात सभा

पंतप्रधान मोदी दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघात थेट प्रक्षेपण पद्धतीनेच मतदारांशी संवाद साधणार आहेत

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारासाठी पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी रविवारी दि. 6 फेब्रुवारी गोव्यात येणार आहेत. ते दुपारी साडेचार वाजता उत्तर गोव्यातील 20 मतदारसंघातील मतदारांना थेट प्रक्षेपण पद्धतीने संबोधित करणार आहेत. यानंतर 9 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता पंतप्रधान मोदी दक्षिण गोव्यातील वीस मतदारसंघात थेट प्रक्षेपण पद्धतीनेच मतदारांशी संवाद साधणार आहेत.

उत्तर गोव्यातील संबोधनासाठी साखळी येथे खास व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सह प्रभारी दर्शना जरदोश, पक्षाचे राज्य प्रभारी सी. टी. रवी आदी उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भाषणाविषयी राज्यभरात उत्सुकता आहे. गेले दशकभर भाजपची सत्ता राज्यावर आहे. राज्याला भेडसावणाऱ्या काही प्रश्नांविषयी पंतप्रधान कोणते मार्गदर्शन करतील याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मोदींचे भाषण ऐकता यावे आणि पाहता यावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्येक ठिकाणी पाचशे जणांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यासाठीही अशीच व्यवस्था असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT