Bolmax Pereira objectionable comments on Shivaji maharaj  Dainik Gomantak
गोवा

'छत्रपती शिवाजी महाराज हिरो पण देव नाही', फादर बोलमॅक्स परेरा यांचे वक्तव्य; काणकोणात तक्रार दाखल

शिवप्रेमींनी फादर परेरा यांच्याविरोधात काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Pramod Yadav

Bolmax Pereira objectionable comments on Shivaji maharaj: 'छत्रपती शिवाजी महाराज हिरो पण देव नाही' असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले आहे. याप्रकरणी शिवप्रेमींनी फादर परेरा यांच्याविरोधात काणकोण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करून गोव्यातील जनतेच्या भावना दुखवल्या आहेत. असे शिवप्रेमींनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. काणकोणचे रहिवासी सम्राट भगत यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले फादर बोलमॅक्स परेरा?

काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये एक घटना घडली. येथील पंचायतीचा सरपंच सरपंच ख्रिचन असल्याने मोठा वाद झाला. छत्रपती शिवाजी देव झालेत, पण शिवाजी महाराज देव नाहीत. शिवाजी राष्ट्रीय हिरो आपण त्यांना मान दिला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे.

या राज्यासाठी त्यांनी केलं त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते हिरो आहेत पण देव नाहीत. पण हिंदू लोकांनी त्यांना देव केलं आहे. असे वक्तव्य फादर बोलमॅक्स परेरा यांनी केले आहे.

खरेच हिंदू खतरे में है, असे मी पुन्हा म्हणतो. आपण हिंदूंना विचारायला हवे की छत्रपती शिवाजी महाराज तुमचा देव? तर ते देव नाहीत राष्ट्रीय हिरो आहेत. असे वक्तव्य परेरा यांनी केले आहे.

फादर बोलमॅक्स परेरा एसएफसी चर्च चिखली येथे बोलताना वरील वक्तव्य केले आहे. परेरा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. परेरा यांनी गोव्यातील जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवप्रेमींनी या तक्रारीद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT