Goa Ganesha Festival Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesha Festival: बाप्पालाही यंदा महागाईची झळ

मूर्तीकार चिंताग्रस्त : माती, रंग तसेच कामगारांची मजुरी वाढल्याचा परिणाम

Shreya Dewalkar

Goa Ganesha Festival: गणेश चतुर्थीला आता महिनाभर बाकी राहिल्याने लगबग वाढली आहे. चित्रशाळांत गणेशमूर्तींचे आगमन झाले आहे. परंतु वाढत्या महागाईची झळ यंदा बाप्पालाही बसणार असून मूर्तींच्या किमतीत जबर वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारने अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी मूर्तिकारांकडून होत आहे.

काही चित्रशाळेत गणेशमूर्तींचे रंगकाम जोरात सुरू असल्याचे दिसून येते. दिवसरात्र कलाकार कामात मग्न असलेले दिसतात. परंतु महागाईमुळे यंदा गणेश मूर्तीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता या कलाकारांकडून व्यक्त होत आहे.

82 वर्षांचे मडगावमधील एक प्रसिद्ध कलाकार तुळशीदास नाईक यांनी सांगितले की, माती, रंग तसेच कामगारांची मजुरी वाढल्याने मूर्तीच्या किमतीत वाढ केल्याशिवाय यंदा पर्याय नाही. मातीची 40 किलो पिशवी 600 रुपये मिळते, शिवाय रंगाच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे यंदा गणपती दोन ते तीन हजार रुपयांना विकावा लागणार आहे.

प्रत्येक मूर्तीमागे १०० रुपये अनुदान सरकारकडून मिळते, त्यात वाढ होणे आवश्‍यक आहे. सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान गणेश मूर्तींच्या किमती वाढत असल्यामुळे लहान मूर्तींना मागणी वाढल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसत आहे.

अनुदानात वाढ हवी

मडगावमधील आणखी एक चित्रकार सूर्यकांत विठ्ठल शेट प्रियोळकर यांनी सांगितले की, आम्ही एक फूट उंचीच्या मूर्तीला १००० रुपये तर दीड फूट उंचीच्या मूर्तीला १३०० रुपये घेतो. सरकारने अनुदान वाढवणे आवश्यक आहे, असे त्याने सांगितले. सूर्यकांतचे वडील विठ्ठल प्रियोळकर फोंड्याहून मडगावी स्थायिक झाल्यास ७५ वर्षे झाली. आता सूर्यकांतच गणेश मूर्ती करण्यास लागल्यास ५० वर्षे झाली, असे ते सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT