Price Hike Of Eggs Gomantak Digital Team
गोवा

Price Hike of Eggs : मासेमारी बंदीमुळे अंड्यांचा भाव वाढला

श्रावण महिन्‍यापर्यंत दर चढेच राहणार

गोमन्तक डिजिटल टीम

मासेमारी बंदीमुळे एका बाजूने मासळीचा तुटवडा, त्यातच तिचा दर गगनाला पोचलेला असतानाच आता बॉयलर अंड्यांचाही भाव हळूहळू वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यापासून अंड्यांच्या घाऊक दरात वाढ होताना आता शंभर अंड्यांमागे 585 रुपये अशी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मासेमारी बंदी काळात जून महिन्यात 500 रुपये 100 नग असे अंड्यांचे दर होते.

खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी लागू झाल्याने पुढील दीड ते दोन महिने मासळीचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यापर्यंत तरी अंड्यांना तेजी येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस अंड्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. काही घाऊक विक्रेत्यांकडूनही तसे संकेत मिळाले आहेत. आधीच मासळीचा तुटवडा त्यातच महाग त्यामुळे आता अंड्यांनाही भाव वाढू लागला असून, मागणीही चांगली आहे. मासळीपाठोपाठ अंडी महाग होत असल्याने खवय्यांना जिभेला लगाम घालावा लागणार आहे.

डिचोली बाजारात बॉयलर अंडी उपलब्ध होत आहेत. त्यात कर्नाटक राज्यातून आयात अधिक होत असते. अजून तरी डिचोलीत बॉयलर अंड्यांची आवक समाधानकारक असली तरी दरात मात्र हळूहळू वाढ होत आहे. महिन्यापूर्वी 500 रुपये शंभर नग असे अंड्यांचे घाऊक दर होते. त्यात आता वाढ होताना शंभर नगामागे 585 रुपये असे दर झाले आहेत. 65 रुपयांवरून आता 80 रुपये डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. ग्रामीण भागात तर 85 रुपये डझन याप्रमाणे बॉयलर अंडी विकण्यात येत आहेत.

गावठी अंडी 250 रुपये डझन!

दुसऱ्या बाजूने तुटवड्यामुळे गावठी अंडीही महाग झालेली आहेत. डिचोली बाजारात क्वचितच गावठी अंडी विक्रीस उपलब्ध होत आहेत. सध्या 250 रुपये डझन याप्रमाणे गावठी अंडी विकण्यात येत आहेत. गावठी अंडी आणखी महाग होण्याचेही संकेत मिळत आहेत. त्‍यामुळ सर्वसामान्‍य लोकांच्‍या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT