Mine Dainik Gomantak
गोवा

Goa Mine: खाण पट्ट्यांतील भूस्खलन रोखा

पर्यावरणप्रेमींची मागणी: खबरदारीच्या उपाययोजनांची आवश्यकता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mine पाचवाडा - लामगाव येथील खाण खड्डे आणि टप्पे योग्यरीत्या झाकण्यात आलेले नाहीत. तसेच दरडी कोसळू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. लोकांच्या सुरक्षेचा विचार करून खाण टप्पे खाण खड्ड्यात कोसळू नयेत यासाठी खबरदारीचे उपाय करायला पाहिजे होते.

आता पावसाच्या तोंडावर हे खाण टप्पे सुरक्षित राहण्यासाठी त्वरित उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

मये येथील स्थानिक रमेश गवस यांनी सांगितले की, खाण खड्डे आणि मातीचे ढिगारे यांचे टप्पे ताडपत्रीने झाकलेले असावेत. जेणेकरून गाळ खाण खड्ड्यात जाऊ नये. याआधी जेव्हा खाण व्यवसाय सुरू होता, तेव्हा अशा उपाययोजना केल्या जात होत्या.

राज्य सरकारने खाणकाम करणाऱ्या कंपन्यांना खाण सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना द्यायला हव्या होत्या. खाण खात्याने या खाण क्षेत्रांची नियमित तपासणी करायला हवी होती असे मला वाटते.

भूस्खलन आणि इतर अनुचित घटना टाळण्यासाठी खाण खड्ड्यांपुढील टप्पे काही वर्षांपूर्वी झाकण्यात आले होते, परंतु खाणबंदीनंतर हे टप्पे उघडे राहिले आहेत. त्यामुळे खड्ड्यांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता आहे.

- हनुमंत परब, पिसुर्ले शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

मातीचे ढिगारे, खाण टप्पे जे उघडे पडले आहेत, ते योग्यरीत्या झाकले गेले पाहिजेत आणि खाण खड्ड्यांमध्ये भूस्खलन टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत.

- क्लॉड अल्वारिस, पर्यावरण कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT