गोव्यात आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्सवाची जय्‍यत तयारी Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्सवाची जय्‍यत तयारी

देशभरातील 10 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग शक्‍य : जागतिक विक्रमाला घालणार गवसणी

दैनिक गोमन्तक

पणजी: भारताचा सातवा आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (International Science Festival) 10 ते 13 डिसेंबर दरम्यान पणजी (Panaji) येथे होत आहे. महोत्सवाचे उद्‍घाटन केंद्रीय विज्ञान, तंत्रज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, (CM Pramod Sawant) केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमवेत केंद्रीय सचिव डॉ. रविचंद्रन, डॉ. चंद्रशेखर, डॉ. शेखर मांडे, डॉ. राजेश गोखले यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सचिव तारीक थॉमस यांनी दिली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ जावेद बेग, सुहास गोडसे हे उपस्थित होते.

केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान भारती, राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन संस्था आणि गोवा (Goa) सरकारच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या तीन दिवसीय विज्ञान महोत्सवामध्ये (International Science Festival) देशभरातील दहा हजारांहून अधिक विद्यार्थी (Students) सहभागी होणार आहेत. त्‍यासाठी राज्यभरात जनजागृती करण्यासाठी विज्ञान रथयात्रा आयोजित केली आहे.

यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना ‘विज्ञानातील सर्जनशीलतेचा उत्सव करणे’ ही आहे. आयआयएसएफ 2021 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रदर्शनासह 12 कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने महोत्सवातील ( Festival) कार्यक्रमांची रचना केली आहे.

दोन हजार कारागीरांचा सहभाग

गेल्या वर्षी कोविड (Corona) महामारीमुळे महोत्सव आभासी पद्धतीने आयोजित केला होता. यावर्षी 10 ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित केलेला महोत्सव आभासी आणि प्रत्यक्ष स्वरुप असा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. महोत्सवात दोन हजार पारंपरिक कारागीर आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून विज्ञानविषयक भूमिका मांडणार आहेत. महोत्सवात विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची (Technology) माहिती देण्यात येणार आहे.

महोत्‍सवाचे वैशिष्‍ट्य

1) विज्ञान महोत्‍सवात विद्यार्थ्यांच्या तीन उपक्रमांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे.

2) सात हजार विद्यार्थी पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्‍टिंग) मध्ये सहभागी होत संदेश देणार आहेत.

3) महोत्सवात विद्यार्थ्यांना जगातील सर्वांत मोठी दुर्बीण पाहण्याची संधी मिळणार आहे.

4) विद्यार्थी गगनयान रॉकेटची प्रतिकृती तयार करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT