Goa Election 2022  Dainik Gomantak
गोवा

निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणूक (Assembly Election) मतदानाला चार दिवस उरले असून राज्यातील निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. ही यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. सुमारे 25 हजारांहून अधिक कर्मचारी या निवडणूक यंत्रणेत सामील आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावरील तयारी पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत प्रचाराच्या काळात ‘सी व्हिजिल’वर सुमारे 496 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील बहुतेक तक्रारी या परस्परविरोधी उमेदवारांकडून मतदारांना आमिष दाखवणे तसेच कोविड (covid) मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केलेल्याच्या असून त्याची शहानिशा करून निकालात काढल्या आहेत.

मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा प्रचारही शिगेला पोहचला आहे. उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते रात्रंदिवस प्रचारात गुंतले आहेत. प्रचारावेळी मतदारांना आमिषे दाखवण्याचे तसेच कोविड मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी ‘सी व्हिजिल’ या ॲपवर दाखल होत आहेत. त्याची शहानिशा करून त्या निकालात काढण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मद्यसाठा व रोख रक्कम तसेच इतर वस्तू मिळून सुमारे 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यासंदर्भातचे गुन्हे संबंधित क्षेत्रातील पोलिस स्थानकात नोंद करण्यात आले आहेत. पुढील दिवसात पोलिस (police) व अबकारी खात्यातर्फे ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.

100 मतदान केंद्रात महिला कर्मचारी

महिला निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 100 मतदान केंद्रे तसेच विकलांग कर्मचारी असलेली 5 व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आलेली 10 मतदान केंद्रे ही यावेळचे वेगळे आकर्षण असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी शामियाना, विकलांगसाठी रँप तसेच पाण्याची व शौचालयाच्या सुविधांची सोय करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी शौचालय नाही तेथे मोबाईल शौचालय ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्वसाधारण व कोविड मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यात येत आहे.

55 निमलष्करी दल कंपन्या

राज्यात सुमारे 1722 मतदान केंद्रे आहेत त्यापैकी 732 ठिकाणी एक मतदान केंद्र, 346 ठिकाणी एकत्र दोन मतदान केंद्रे, 75 ठिकाणी एकत्रित तीन मतदान केंद्रे, 17 ठिकाणी एकत्रित चार मतदान केंद्रे तसेच मांद्रे येथे एका ठिकाणी पाच मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी मिळून सुमारे 8600 निवडणूक कर्मचारी तसेच दहा टक्के राखीव कर्मचारी व इतर निवडणूक अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे 10 हजार कर्मचारी या निवडणुकीत काम करत आहेत. पोलिस खात्यातील सुमारे 8 हजार पोलिस व गृहरक्षक कर्मचारी तसेच 55 निमलष्करी दलाच्या कंपन्या मतदानदिवशी तैनात करण्यात येणार आहेत. सध्या 30 कंपन्या आल्या असून उर्वरित येत्या शनिवारपर्यंत दाखल होतील.

37 निवडणूक निरीक्षक

या निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) 37 देखरेख निवडणूक निरीक्षकांची केंद्रातून नियुक्ती केली आहे. त्यामध्ये 21 सर्वसाधाऱण निरीक्षक, 9 खर्च देखरेख निरीक्षक, 5 पोलिस देखरेख निरीक्षक तर दोन विशेष निरीक्षकांचा समावेश आहे. या विशेष निरीक्षकांमध्ये प्रत्येकी एक पोलिस व सर्वसाधारण निरीक्षकाचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात दोन निर्वाचन अधिकारी व प्रत्येक मतदारसंघासाठी एक सहाय्यक निर्वाचन अधिकारी आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी दोन भरारी पथके तैनात असून कोणतीही अनुचित घटना होऊ नये यावर लक्ष ठेवून आहेत.

मतदान दिवशी कडक बंदोबस्त

या मतदानाच्या दिवशी राज्यातील पोलिस खात्याचे व निमलष्करी दलाचे मिळून सुमारे 10 हजार पोलिस कार्यरत असतील. कडक पोलिस बंदोबस्त व भरारी पथकांसह अनेक निवडणूक अधिकारी गस्तीवर असतील. निवडणूक (Election) शांततापूर्ण व अधिक संख्येने मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक अधिकारी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यास जागृत करत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT