54th International Film Festival India Goa Dainik Gomantak
गोवा

54th IFFI Goa: 54 व्या ‘इफ्फी’ची जोरदार तयारी सुरू ‘सुकाणू समिती’ ची आठवड्याभरात बैठक

54th International Film Festival India Goa: प्रतिनिधी नोंदणीचा 3,300 चा टप्पा पार

दैनिक गोमन्तक

54th International Film Festival India Goa: अवघ्या 18 दिवसांवर आलेल्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी जोरदार सुरू असून बहुतांश निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

या चित्रपट महोत्सवासाठी आतापर्यंत देश-विदेशातील 3 हजार 39 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.

आयोजन समितीच्या सुकाणू समितीची महत्वपूर्ण बैठक या आठवड्यात होत आहे, अशी माहिती प्रमुख आयोजक गोवा मनोरंजन संस्थेने दिली आहे.

20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होत असलेला हा आंतरराष्ट्रीय महोत्सव जगभरातील सिनेप्रेमींना पर्वणी आहे. सुकाणू समितीची बैठक आठवड्याभरात होईल,अशी माहिती आहे.

इंडियन पॅनोरमाची झाली घोषणा

निर्मात्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची, आकांक्षांची आणि संघर्षाची झलक 54 व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे.

इंडियन पॅनोरमाची घोषणा करण्यात आली असून या पूर्ण लांबीचे 25 चित्रपट असून 20 लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. यात सर्वाधिक 14 हिंदी चित्रपटांशिवाय मल्याळम, मराठी, कोकणी, कन्नड, आदी भाषांतील चित्रपटही सिने रसिकांना पाहता येणार आहेत.

प्रतिनिधी 10 हजारांवर नेण्याचा प्रयत्न

इफ्फीत चित्रपटांची जागतिक स्पर्धा होते. या स्पर्धेसाठी कोट्यवधींची पारितोषिके असून या स्पर्धेसाठी परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.इफ्फीसाठी देशभरातून प्रतिनिधींकडून नोंदणी केली जाते. यात सिनेनिर्मिती, सिने रसिक, विद्यार्थी, यांचा समावेश असतो. आतापर्यंत 3 हजार 300 प्रतिनिधींनी नोंदणी केली असून हा आकडा 10 हजारापर्यंत नेण्याचा आयोजकांचा दावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT