Premandan Naik Hunger Strike Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: उपोषण तूर्त मागे; पण भूतानी प्रकल्पाविरोधातील लढा कायम! प्रेमानंद नाईकांनी स्पष्ट केली भूमिका

Premandan Naik Hunger Strike: प्रेमानंद नाईक यांनी सांकवाळ शिंदोळी चर्चचे फादर कॅनथ तेलिस यांच्या हातून सरबत घेऊन उपोषण मागे घेतले.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: साकवाळ-सावळफोंड गावात होत असलेल्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात बेमुदत उपोषणाला बसलेले माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांनी आपले उपोषण दहाव्या दिवशी मागे घेतले. मात्र, सांकवाळ पंचायतीसमोर प्रेमानंद नाईक यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

प्रेमानंद नाईक यांनी सांकवाळ शिंदोळी चर्चचे फादर कॅनथ तेलिस यांच्या हातून सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी त्याच्या समवेत आमदार क्रुज सिल्वा, काँग्रेसचे गिरीश चोडणकर, प्रतिमा कुतिन्हो, प्रा. रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक, रामा काणकोणकर, शंकर पोळजी , पंच तुळसीदास नाईक, मॉरविल कार्व्हालो, ओलेंसियो सिमॉईश , तारा केरकर व इतर आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमेश कंट्रक्सनच्या ‘भूतानी इन्फ्रा प्रकल्पा’ ला सांकवाळ पंचायतीने दिलेले परवाने रद्द करण्यासाठी माजी सरपंच प्रेमानंद नाईक उपोषण करत होते. यावेळी प्रेमानंद यांना कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, दक्षिण गोवा खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी पाठिंबा देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.परंतु जोवर सांकवाळ व राज्य सरकार भूतानी प्रकल्पाला दिलेले परवाने रद्द करत नाही. तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याचे प्रेमानंद नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवार, (ता.२९) रात्री खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, पंच मॉरविल कार्व्हालो यांनी प्रेमानंद नाईक यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करण्यासाठी आले होते. परंतु प्रेमानंद झोपले होते, त्यामुळे खासदार फर्नांडिसनी त्यांना जागे करणे टाळले. दिवाळी मोठा सण असल्याने आम्ही त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी आले होते, असे सांगितले.

पतीची बदनामी करणाऱ्यांना कोठडीत पाठवणार!

प्रेमानंद नाईक यांच्या पत्नी उज्वला नाईक यांनी सर्व प्रथम सर्वांचे आभार मानून माझ्या पतीची बदनामी करणाऱ्या तिघांना कोठडीत पाठवणार, असल्याचे जाहीरपणे सांगितले. आमचे उपोषण या पुढेही ‘भूतानी’ च्या विरोधात सुरूच राहणार आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, असे आंदोलनाला बसलेले प्रेमानंद नाईक यांनी सांगितले. गोवा वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रीत राहून लढा देणे आवश्यक असल्याचे नाईक यांनी आवाहन केले. नंतर सांकवाळ पंचायती समोर सुकूर मिनेझीस , पिदोल परेरा, गिलरॉप कोस्टा यांनी साखळी उपोषण सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ''भाजपला राज्यातील विरोधकांना संपवाचंयं, पण ते शक्य नाही...'', सरदेसाईंचा हल्लाबोल!

Goa Cabinet: ‘वाचाळवीर’ स्कॅनरखाली! चार मंत्र्यांना वगळून नव्यांना संधी द्या; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण

Goa Tourism: पर्यटनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार; गोवा-उझबेकिस्तान संबंधांना मिळणार नवा आयाम!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT