Garbage Problem in Goa Dainik Gomantak
गोवा

साळगाव कचरा प्रकल्पातून तीव्र दुर्गंधी: प्रेमानंद दिवकर

'याआधी ही समस्या क्वचितच जाणवत होती'

दैनिक गोमन्तक

कळंगुट: साळगांव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातून गेल्या अनेक दिवसांपासून दुर्गंधी पसरल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन शुक्रवारी संध्याकाळी कळंगुट फोरमकडून येथील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी प्रकल्पात होत असलेल्या कचरा प्रक्रियेतून परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याचे कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी सांगितले.

याआधी ही समस्या क्वचितच जाणवत होती, परंतु सध्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात आसपासच्या पिळर्ण पासून ते साळगाव, कांदोळीत दुर्गंधी पसरल्याचे दिवकर म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात फोरमकडून कचरा व्यवस्थापन मंत्री बाबुश मोन्सेरात तसेच साळगाव येथील प्रकल्प व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रारी नोंदविण्यात आल्याचे दीवकर यांनी सांगितले. याआधी येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची ज्या पद्धतीने निगा राखली जायची, तशीच विद्यमान सरकारकडून राखली जावी, अशी मागणी फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत फोरमचे क्लोटीड्स ब्रागांझा, क्रुझ सिल्वेरा, केविन सिल्वेरा, पर्पेच्युओ फर्नांडिस, तसेच ज्यो डिसौझा उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: रोनाल्डो, मेस्सी आणि एमबाप्पे...फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार; येथे पाहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Goa Road Accidents: राज्यात अवघ्या 15 दिवसांत 17 जणांचे अपघाती मृत्यू , जून घात महिना, मृत्यूंचा आकडा वाढला

Water Conservation: फक्त सक्ती नको, लोकसहभाग हवा! मांद्रेच्या ‘धवरुख’ संस्थेचा जलसंवर्धन उपक्रम ठरतोय राज्यासाठी आदर्श

Monsoon Delay: पावसाने फिरवली पाठ; गोव्यातील धरणांची पाणी पातळी खालावली, 'या' भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चिघळणार?

Viral Video: "तुला खोट्या प्रकरणात अडकवेन!" महिला कर्मचाऱ्याची तरुणाला थेट धमकी, पोस्ट ऑफिसमधील हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

SCROLL FOR NEXT