vaccination Dainik Gomantak
गोवा

Goa Vaccination: पहिल्यांदाच गरोदर महिलेला कोरोना प्रतिबंधक लस

गोव्यात लसिकरणाला (Vaccination) मोठा प्रतिसाद मिळत असून आज 12820 लोकांचे लसीकरण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्र सरकारने (Central Government) स्थापन केलेल्या कोरोना नियंत्रण पथकाने मान्यता दिल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच एका गरोदर महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस (Vaccination) देण्यात आला आहे. मणिपाल इस्पितळ दोनापावला येथे डॉक्टर तारांजीत कौर चड्डा यांनी कोवेक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे गोव्यात (Goa) गरोदर महिलेला कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यास मान्यता मिळाल्यानंतर लस घेणारी ती पहिली गरोदर महिला ठरली आहे . आज ता. 6 जुलै रोजी हा डोस देण्यात आला . यावेळी त्यांचे पती सिमरन चड्डा, मुलगी विवीयाना चड्डा व मणिपाल इस्पितळाचे डॉक्टर शेखर साळकर उपस्थित होते. (Pregnant woman was vaccinated against corona For the first time in Goa)

दरम्यान गोव्यात लसिकरणाला मोठा प्रतिसाद मिळत असून आज 12820 लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे राज्यातील लस घेतलेल्या लोकांची संख्या 9 लाख 88 हजार 082 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात 8932 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसिचा पहिला डोस तर 3878 नागरिकांनी लसिचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आतापर्यंत 9 लाख 88 हजार 082 एवढे लसीकरण पूर्ण झाले . यात 8,54,820 लोकांनी पहिला डोस तर 1,33,262 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

SCROLL FOR NEXT