Margao Municipal Dainik Gomantak
गोवा

मडगाव नगरपालिकेची मॉन्सूनपूर्व कामे रेंगाळली

सर्वसामान्यांना पडला प्रश्‍न

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव नगरपालिका बैठकीवेळी मॉन्सूनपूर्व कामे मे महिन्याच्या सुरुवातीला करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र ही कामे पूर्ण करण्यासाठी रोजंदारीवर कामगार घेण्याची निविदा प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असल्याने ही कामे पूर्ण होणार का, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे.

20 एप्रिल रोजी नगरपालिकेच्या बैठकीवेळी ही कामे पूर्ण करण्याविषयी चर्चा करण्यात आली होती. यात 15 लाख रुपये आपत्कालीन व्यवस्थापन निधी व 6 लाख रुपये पालिका निधी या कामावर खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली होती.

या ठरावानुसार जिल्हा पालिका संचालनालयाची मंजुरी घेतल्यानंतर निविदा काढून ठेकेदार नेमून सर्व प्रभागातील कामे 1 मेपासून सुरू करण्यात येतील, असा प्रस्ताव जिल्हा पालिका संचालनालयाकडे पाठवण्यात येईल आणि जूनपूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. यासंदर्भात नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी माहिती देताना सांगितले, निविदा जारी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारी या कामाची निविदा खोलण्यात येणार असून, त्यानंतर ठेकेदाराकडून तात्काळ कामांना सुरुवात करण्यात येणारआहे.

ही निविदा ठेकेदाराला दिल्यानंतर प्रथम 1 ते 6, 7 ते 12, 13 ते 18 व 19 ते 25 अशा प्रभाग वर्गवारीने ही कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT