Pramod sawant remember the freedom fighters who contributed for the liberation of GoaPramod sawant remember the freedom fighters who contributed for the liberation of Goa
Pramod sawant remember the freedom fighters who contributed for the liberation of GoaPramod sawant remember the freedom fighters who contributed for the liberation of Goa 
गोवा

गोवा मुक्तिसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानींनीची मुख्यमंत्र्यांना झाली आठवण

दैनिक गोमन्तक

पणजी: आज आपण गोवामुक्तीच्या सोनेरी असा ६० वा मुक्तिदिन आज आपण साजरा करीत आहोत. गोवा मुक्तीसंग्रामात सैन्यदलाचे योगदान महत्वाचे असून आजच्या दिवशी सैन्य दलाला नमन. ज्या स्वातंत्र्यसेनानींनी गोवा मुक्तिसाठी आपले योगदान दिले त्यांची आठवण आजच्या दिवशी येत असल्याची प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली. गोवा मुक्तीदिनी आयोजित पणजीतील कांपाल येथील मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


कोरोनासारख्या महाअवघड कालावधीत केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली. या कालावधीत अनेक अडचणी आल्या, मात्र आपण सर्वांनी मिळून त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न केला. जे सरकार चांगले कार्य करते त्यांच्या कामाची दखल जनता घेते, याची प्रचिती हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीकडे आम्ही आता वेगाने कार्यरत आहोत आणि यासाठी आपण एकत्र वाटचाल करणे गरजेचे असल्याचेसुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 


यावेळी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस खात्यातील ७ पोलीस अधिकारी आणि ३ अग्निशमन दलातील जवानांना मुख्यमंत्री सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. तसेच वन खात्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. आत्माराम प्रभुदेसाई यांना यावर्षीचा कृषिरत्न पुरस्कार तर आत्माराम उपाध्ये बोरकर याना कृषिविभूषण आणि सौरभ कामत यांना कृषीभूषण पुरस्कार देण्यात आला.सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचेसुध्दा यावेळी सत्कार करण्यात आले.


या कार्यक्रमाला राजकिय नेते, नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस उपस्थित होते. यावेळी कवायत संचलन करण्यात आले. 
कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांनी मास्क घातला होता शिवाय सुरक्षित अंतर पाळले जाईल याची काळजी घेण्यात आल्याचे पहायला मिळाले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live Update: पर्वरी येथे मराठी राजभाषा साहित्य संमेलनास सुरुवात

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Panaji News : भाजपने पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीच्या प्रवक्त्यांची मागणी

Mark Zuckerberg यांचा पगार फक्त 83 रुपये, पण सुरक्षेवर होतो कोट्यवधींचा खर्च; उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब पाहून व्हाल थक्क!

Valpoi News : प्रलंबित खटल्यांमध्ये ‘मध्यस्थी’ उत्तम पर्याय : ॲड. सावईकर

SCROLL FOR NEXT