Pernem News Dainik Gomantak
गोवा

Pernem News: पेडणे येथे प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव

पत्रकार परिषदेत माहिती ः शनिवारपासून आयोजन; विविध कार्यक्रमांची मेजवानी

गोमन्तक डिजिटल टीम

नटवर्य प्रभाकर पणशीकर कलामंच आणि गोवा मराठी अकादमी, पेडणेतर्फे ता. 18 व 19 मार्च रोजी दोन दिवसांचा नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव आयोजित केला असून 18 मार्च रोजी संध्याकाळी 6 वा. उदघाटन होईल.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर यांची कन्या जान्हवीताई पणशीकर यांची या कार्यक्रमास उपस्थिती लाभणार आहे. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, नगराध्यक्ष माधव सिनाय देसाई व श्री भगवती, रवळनाथ देवस्थानचे अध्यक्ष आदित्य देशप्रभू उपस्थित रहाणार असल्याची माहिती गोवा मराठी अकादमी, पेडणे प्रभागचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील श्री भगवती हायस्कूलमध्ये प्रभाकर पणशीकर कलामंचचे अध्यक्ष प्रवीण कोटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला विठ्ठल प्रभूदेसाई, चंद्रकांत सांगळे, प्रेमनाथ धारगळकर, प्रशांत मांद्रेकर, आनंद नाईक, कौशल पेडणेकर, राजू बोंद्रे, उदय गुरव उपस्थित होते.

पणशीकर कलामंचचे पदाधिकारी प्रशांत मांद्रेकर यांनी एकंदर होणाऱ्या नाट्यप्रयोगांची आणि पणशीकर परिवाराकडून सादर होणाऱ्या सांगितिक कार्यक्रमाची यावेळी कल्पना दिली.

नाट्‍यप्रयोग व सांगितिक कार्यक्रम

उद्‍घाटनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वा. सातेरी कलामंदिर हसापूरतर्फे गोविंद नाईक दिग्दर्शित ‘हॕण्डस् अप’ हे दोनअंकी नाटक सादर होणार आहे. शनिवारी (ता. 19) संध्याकाळी 6 वा. ‘नाट्यप्रभा’ हा पणशीकर मंडळींचा एक सांगितिक कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना विघ्नेश जोशी यांची आहे. या कार्यक्रमात रघुनंदन पणशीकर, जान्हवी पणशीकर आणि देविका पणशीकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर श्री शांतादुर्गा सांस्कृतिक आणि क्रीडा संघ, वारखंडतर्फे ‘रणांगण’ हे प्रदीप परब दिग्दर्शित नाटक सादर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला गणरायाची विशेष कृपा! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, समृद्धी, नोकरीची संधी आणि धनवर्षाव

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

SCROLL FOR NEXT