Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

गोमन्तक डिजिटल टीम

काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले आणि गोव्यात मोठा राजकीय भूकंप झाला. देवाला साक्षी माणून कधीही पक्षांतर करणार नाही अशी शपथ घेतलेल्या आमदरांना सात महिन्यांतच आपल्या शपथीचा विसर पडला अन् त्यांनी पक्षांतर केले. यामध्ये काँग्रेसमधील जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat), विरोधी पक्षनेते मायकल लोबो (Michael Lobo) यांचा देखील समावेश असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्षांतरावर सर्व स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

गोव्यातील भाजप सरकारमध्ये मंत्री असणारे सुदिन ढवळीकरांनी (Sudhin Dhavalikar) देखील पक्षांतराच्या दोन दिवसांनंतर यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर मंत्रालयातील आपल्या कक्षात बसले असताना त्यांना काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारला असता त्यांना, ‘सामना’ चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताच्या ओळी आठवल्या. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या गीताच्या ओळी गात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, काँग्रेसमधून आलेल्या आठ आमदारांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपचे संख्याबळ वाढले आहे. पण, बंडखोर आमदारांनी तीन मंत्रिपदांची मागणी केली आहे. यासाठी मंत्रिमंडळातून तीन मंत्र्यांना कमी करावे लागणार आहे. यात सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मच्छीमार मंत्री नीळकंठ हर्ळणकर किंवा कृषिमंत्री रवी नाईक यांचा नंबर लागू शकतो. त्याजागी विद्यमान बंडखोर मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा आणि अन्य एकाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT