Curchorem amit patkar Dainik gomantak
गोवा

'मंत्री निलेश काब्रालांचा दावा खोटा, प्रत्यक्षात स्थिती वेगळीच'

युवकांना नोकऱ्या नाहीत, महिलांना रोजगार नाही, मतदारसंघात काही ठिकाणी तर वीज पाणी अशा प्राथमिक सुविधाही नाहीत

दैनिक गोमन्तक

कुडचडे : कुडचडे हा विकास झालेला मतदारसंघ असा दावा विजमंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) करत असले तरी प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्याने युवकांमध्ये आलेले नैराश ही कुडचडेतील मुख्य समस्या असून या परिस्थितीत त्यांना बदल हवा आहे.

व्हायब्रन्ट कुडचडे या बॅनरखाली निवडणूकीत (election) उतरलेले कुडचडे येथील युवा उद्योजक आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार यांच्या प्रचाराच्यावेळी लोकांकडून या समस्या पुढे येत आहेत. या तरुण उमेदवाराने केलेला वेगळ्या प्रकारचा प्रचार यामुळेही त्यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) प्रचारावर निर्बंध आणण्यापूर्वी त्यांनी कुडचडेच्या मतदारांकडे 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम हाती घेतला होता. या कार्यक्रमाला संपूर्ण कोकणी वळण देताना त्यांनी 'एक च्या अमित पाटकरा सांगतान' असे त्याचे नामकरण केले होते.

या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी होडार, शेळवण, शेल्डे, असोल्डे तसेच अन्य भागात त्यांनी लोकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

मागच्या 10 वर्षात कुडचडेत काहीच विकास झालेला नाही. युवकांना नोकऱ्या नाहीत, महिलांना रोजगार नाही, मतदारसंघात काही ठिकाणी तर वीज पाणी अशा प्राथमिक सुविधाही नाहीत. अशा परिस्थितीमूळे तरुणांमध्ये आलेले नैराश्य आणि त्यात्यून वाढलेली व्यसनाधीनता याने संपूर्ण मतदारसंघ पोखरून गेल्याचे आपल्या नजरेस आले. ही परिस्थिती कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला व्याकुळ करणारी होती असे पाटकर यांनी सांगितले.

पाटकर हे एक यशस्वी युवा उद्योजक असून या पूर्वी ते समाजकार्यात सक्रिय होते. पण मतदारसंघात पूर्ण बदल घडवून आणायचा असेल तर सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकल्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून काँग्रेस (Congress) पक्षाच्या मदतीने माझे कुडचडे व्हायब्रन्ट करण्याचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांना आणि युवकांना रोजगाराच्या संधी यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम मी माझ्या स्वतःच्या पैशातून करण्याची माझी तयारी आहे असे त्यांनी 'गोमंतक'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

यापूर्वी पाटकर यांनी मंत्र्यांनी यापूर्वी दिलेली आश्वासने आणि नंतर त्या आश्वासनांचा उडालेला फज्जा हे जुन्या व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणून सत्ताधाऱ्यांची झोप उडवून दिली होती. आता कोविड निर्बंध सुरू झाल्यावर आपला प्रचार व्हर्च्युअल पद्धतीने सुरू करण्याचे त्यांनी ठरविले आहे एक दोन दिवसातच आपला हा व्हर्चुअल प्रचार सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT