Congress candidates Dainik Gomantak
गोवा

संभाव्य उमेदवार अस्वस्थ, 'या' चार मतदारसंघात काँग्रेसचा अजूनही सस्पेन्स

..यांना उमेदवारी नाकारल्यास ते बंड करण्याची शक्यता आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेस पक्षाने आज आपली 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असली तरी ज्या ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे, अशा सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी, कुडतरी, बाणावली व नुवे या चार मतदारसंघात उमेदवारी कुणाला हा सस्पेन्स कायम आहे.

काल रात्री दिल्लीत काँग्रेसच्या केंद्रीय समितीची बैठक झाली होती. या बैठकीत निदान कुडतरी बाबत निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, आज याबाबतीत निर्णय घेतला गेलाच नाही.

सध्या काँग्रेसमध्ये (Congress) घरवापसी करू पाहणारे माजी आमदार (MLA) आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना कुडतरीत काँग्रेसची उमेदवारी देण्यात यावी यासाठी मायकल लोबो यांचा गट प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आहे. यामुळेच हा निर्णय झाला नसल्याची माहिती प्राप्त झाली. या मतदारसंघात (Constituency) माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो, त्यांची पत्नी मिशेल रिबेलो, सार्दीनपुत्र शॅलोम सार्दीन, व जोसेफ व्हाझ असे चार उमेदवार शर्यतीत आहेत.

वेळ्ळी मतदारसंघातही काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस यांच्यासह बेंजामिन सिल्वा, सावियो डिसिल्वा व सबिता मास्कारेन्ह असे चार उमेदवार असून उमेदवारी नाकारल्यास येथे सावियो आणि बेंजामिन यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघात मुद्दामहून उमेदवार जाहीर करण्यास वेळ काढला जातो.

बाणावली मतदारसंघात काँग्रेस उमेदवारीसाठी मिकी पाशेको, रॉयला फेर्नांडिस, मिनीन फेर्नांडिस आणि एडविन बार्रेटो असे चार उमेदवार असून पाशेको यांना उमेदवारी नाकारल्यास ते बंड करण्याची शक्यता आहे. नुवे मतदारसंघात आलेक्स सिक्वेरा, पाऊसिलीप दोरादो आणि लिंडन मोंतेरो ही तीन नावे चर्चेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत महापौरपदी 'चीनी एजंट'! 'US News Center' च्या नावाखाली चालवला प्रोपगंडा; ईलीन वांगला होणार 10 वर्षांची शिक्षा?

Vish Yog 2026: ग्रहांच्या महायुतीनं बनला 'विष योग'! 3 राशींच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार; शनीची चाल बदलणार नशीब

Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

Tar River Pollution: तार नदीचे अस्तित्व धोक्यात: वाढत्या प्रदूषणामुळे नदीची अवस्था बिकट VIDEO

Virat Kohli Lizlaz Controversy: "विराटची बदनामी करण्यासाठी मला पैशांचं आमिष दाखवलं" जर्मन मॉडेलचा खळबळजनक खुलासा

SCROLL FOR NEXT