Deadbody At Calangute Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दिल्लीतील युवकाचा गोव्यात खून, शवविच्छेदन अहवालातून माहिती उघड; तिघेजण ताब्यात

Goa Murder Case: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी युवकाचा मृतदेह आढळला होता.

Pramod Yadav

कळंगुट: दिल्लीतील युवकाचा गोव्यात खून झाल्याचे उघड झाले आहे. कळंगुट समुद्रकिनारी शनिवारी (दि. १० ऑगस्ट) आढलेल्या युवकाचा खून झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बागा-कळंगुट समुद्रकिनारी शनिवारी (दि. १० ऑगस्ट) एका युवकाचा मृतदेह आढळला होता. कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असता मृतदेहावर जखमा आढळून आल्या होत्या. युवकासोबत हिंसक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली असून, युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. युवकाचा सुरी हल्ला करुन खून केल्याचे अहवालात म्हटले आहे.

मृत युवक दिल्लीचा रहिवासी असून, त्याच्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. युवक कोणासोबत, का आणि केव्हा गोव्यात आला होता? कोणत्या कारणावरुन त्याचा खून करण्यात आला? कोणी त्याचा खून केला? याबाबत पोलिस तपास करत आहेत.

प्राथमिक संशयावरुन चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT