Court Canva
गोवा

Porvorim: पर्वरीतील रस्त्याचे डांबरीकरण, गटार कामे त्वरित करा! सविस्तर कृती आराखडा आवश्यक; गोवा खंडपीठाचे निर्देश

Porvorim Flyover Construction: ओ कोकेरो ते दामियान दी गोवा हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होण्यासाठी त्वरित डांबरीकरण करणे आवश्‍यक आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Flyover Construction Goa Bench

पणजी: पर्वरीतील उड्डाण पुलाच्या कामावेळी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पर्यायी रस्त्यांचे डांबरीकरण तसेच पाण्याचा निचरा कोणत्याही अडचणीशिवाय व्हावा यासाठी गटारांचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने देत जनहित याचिकेवरील सुनावणी ७ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

जनहित याचिकादार मोसेस पिंटो तसेच पर्वरीवासियांतर्फे हस्तक्षेप अर्जदाराचे वकील अभिजित गोसावा यांना सध्या सुरू असलेल्या कामांमधील त्रुटी व आवश्‍यक त्वरित उपाययोजना याची माहिती देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी सादर केलेल्या सूचनांची गोवा खंडपीठाने दखल घेऊन संबंधित कामे त्वरित करण्याचे निर्देश कंत्राटदार आरआरएसएम यांना दिले.

रस्त्यावर तसेच विशेषतः बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचू नये म्हणून चिखलाने भरलेल्या नवीन गटारे साफ करण्याऐवजी नव्याने तात्पुरत्या गटारांची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त शक्य असेल तिथे रस्त्याच्या कडेला पाणी निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. रस्त्यावरून येणारे पाणी केबलसाठी ठेवण्यात आलेल्या चेंबरमध्ये घुसते त्यामुळे हे टाळण्यासाठी पीडब्ल्यूडीने हे रस्ते असलेल्या ठिकाणी क्रॉस गटारांची व्यवस्था करावी. उंचवटा असलेल्या महामार्गावरील पाणी सखल रस्त्यावरून वाहून येत असल्याने वाहतुकीला कोंडी होते त्यामुळे यासंदर्भात कंत्राटदाराने सविस्तर कृती आराखडा सादर करावा.

ओ कोकेरो ते दामियान दी गोवा हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होण्यासाठी त्वरित डांबरीकरण करणे आवश्‍यक आहे. चोगम रस्त्यावर समान समांतर नियमन करावे तसेच या ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

२४ तासांत पूर्तता

ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या केलेल्या सूचना महत्त्वाच्या व आवश्‍यक असल्याने कंत्राटदाराकडून ही कामे करवून घेतली जातील, असे खंडपीठाला सांगितले.

ज्या काही सूचना याचिकादार व हस्तक्षेप अर्जदाराकडून येतील त्याची पूर्तता २४ तासांत केली जाईल असे आश्‍वासन आरआरएसएम कंत्राटदाराच्या वकिलांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT