भेलपुरीच्‍या गाड्यांनी बळकावली पर्वरी बसथांब्‍याची जागा  Dainik Gomantak
गोवा

पर्वरी बसथांब्‍यावर प्रवाशी जीव मुठीत घेऊन ओलांडतात रस्‍ता

भेलपुरीच्‍या गाड्यांनी बळकावली जागा : प्रवाशांची गैरसोय; पंचायतीचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

पर्वरी: येथील महामार्गावरील शिक्षण मंडळासमोरील बसथांब्‍यावर भेलपुरीच्‍या गाडेधारकांनी अतिक्रमण केले आहे. त्‍यामुळे बस रस्‍त्‍यावर थांबविण्‍यात येत असल्‍याने अन्‍य वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण ठरत आहे. दुपारनंतरच्‍या वेळी या बसथांब्‍यावर वर्दळ असल्‍याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्‍ता ओलांडावा लागत आहे.

येथील ‘मॉल दी गोवा’ परिसरात वाहनांची वर्दळ व वाहने कशीही पार्क करण्‍याच्‍या प्रकारामुळे आधीच हा परिसर अपघातप्रवण झाला आहे. शिक्षण मंडळाजवळील बसथांबा येथे चार रस्‍ते एकत्र येत असल्‍याने धोका ओळखून बसथांबा सुमारे दहा ते पंधरा मीटर अंतरावर ठेवला होता. मॉलमध्‍ये येणाऱ्या लोकांची वाहने त्‍या परिसरात आधीच पार्क केली जात आहेत. त्‍यात आता बसथांब्‍यावर भेलपुरीचे पाच गाडे व अन्‍य तीन स्‍टॉल्‍स काही दिवसांपासून निदर्शनास येत आहेत. त्‍यामुळे बसथांबा आहे कुठे? हे प्रवाशांना शोधावे लागते. पंचायतीने भेलपुरीच्‍या दुकानांना अन्‍य ठिकाणी जागा द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

व्‍यवसायाचा गोलमाल?

बेरोजगारांना व्‍यवसाय देण्‍याच्‍या उद्देशाने स्‍थानिकांना प्राधान्‍य देत पेन्‍ह द फ्रान्‍क पंचायतीने पाच स्‍टॉल्‍सना परवानगी दिली आहे. जर पंचायतीने स्‍थानिकांना रोजगार देण्‍याच्‍या हेतूने परवाने दिले, तर राजस्‍थानी ‘भैय्‍या’ लोकांचा व्‍यवसाय स्‍थानिकांनी कधी आत्‍मसात केला व दर्जेदार भेलपुरी व अन्‍य चविष्‍ट पदार्थ बनविण्‍याची कसब लवकरच आत्‍मसात केल्‍याची उपहासात्‍मक टीका तेथील प्रवाशांनी व्‍यक्त केली. तर काहीजणांना भेलपुरी गाड्यांच्‍या नावाने पंचायतीच्‍या कथित संगनमताने घोळ केल्‍याचा आरोपही केला आहे. ते गाडे राजस्‍थानी ‘भैय्‍यां’ना दिल्‍याचा आरोपही पर्वरीवासीयांनी केला आहे.

पर्वरीतील बसथांबा परिसरात अन्‍यत्र हलविता येणाऱ्या चाकांच्‍या गाड्यांना केवळ स्‍थानिकांनाच प्राधान्‍य या तत्‍वावर व्‍यवसाय करण्‍यास परवानगी दिली आहे. कोविड काळात ज्‍यांचे रोजगार गेले, त्‍यांना प्राधान्‍य देऊन स्‍थानिकांच्‍या अर्जानुसार पाच गाड्यांना परवानगी दिली आहे. सायंकाळी 4 ते रात्रीपर्यंत ते खुले असतात. त्‍यानंतर ते तेथून हलविण्‍यात येतात. - स्‍वप्‍नील चोडणकर, सरपंच, पेन्‍ह द फ्रान्‍क

एफडीए परवान्‍याबाबत साशंकता

सदर भेलपुरीच्‍या पाचही गाड्यांना ‘एफडीए’कडून अधिकृत परवाना मिळाला की नाही, याबाबतही साशंकता आहे. या स्‍टॉल्‍सवर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मॉलमध्‍ये येणारे ग्राहक मोठ्या संख्‍येने असल्‍याने त्‍यांची वर्दळ असते. तसेच आरोग्‍य खात्‍याकडून ना हरकत दाखला मिळविला की नाही, याबाबत माहिती स्‍पष्‍ट होत नसल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT