Portuguese to English Translation Archives Dept Goa 
गोवा

पोर्तुगीज टू इंग्रजी भाषांतर, गोवा पुराभिलेख खात्याच्या ऑनलाईन सेवेचा शुभारंभ

पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर त्याचे इंग्रजी भाषांतर पाहायला मिळणार आहे.

Pramod Yadav

Portuguese to English Translation Archives Dept Goa: गोव्यात सुमारे 450 वर्षाहून अधिककाळ असलेल्या पोर्तुगीज राजवटीमुळे येथील अनेक महत्वाचे आणि ऐतिहासिक दस्तऐवज पोर्तुगीज भाषेत आहेत. यासाठी वारंवार भाषांतराची गरज भासते, हीच गरज लक्षात घेऊन राज्यातील पुराभिलेख खात्याच्या वतीने पोर्तुगीज टू इंग्रजी ऑनलाईन सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज (मंगळवारी, दि.26) ऑनलाईन भाषांतर सेवेचे अनावरण केले. पर्वरी येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

फळदेसाई यांनी ऑनलाइन पोर्तुगीज भाषांतर सेवा यासह डॉ. पांडुरंग शेणवी पिसुर्लेकर रिसर्च फेलोशिप योजना आणि मुख्यमंत्री पुराभिलेख प्रकाशन योजना (अभिलेख संशोधन आणि अनुवादाशी संबंधित प्रकाशनांसाठी विशेष सहाय्य) यांची घोषणा केली.

यावेळी राज्यातील विद्याप्रबोधनी महाविद्यालय, पर्वरी, सोहिरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय पेडणे आणि पीईएस रवी नाईक महाविद्यालय फार्मागुढी, फोंडा या तीन महाविद्यालयांसोबत शैक्षणिक संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

Portuguese to english Translation Archives Dept

पुराभिलेख विभागातील विविध दस्तऐवज पोर्तुगीज भाषेत आहेत, अनेकांना त्याचे भाषांतर करताना अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांना डिजिटल स्वरुपात पोर्तुगीजमधून इंग्रजीत भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर त्याचे इंग्रजी भाषांतर पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे संबधिताला ही सर्व प्रक्रिया देखील ट्रॅक करता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT