Lord Shri Rama Dainik Gomantak
गोवा

सापशिडीचे 50,000 फासे वापरुन गोव्यात साकारले जातेय प्रभू श्री रामाचे चित्र; आशियाई विक्रम माेडीत निघणार

प्रतिमा जेव्‍हा पूर्ण होईल तेव्‍हा डाईस चित्र क्षेत्रातील आशियाई विक्रमही माेडीत निघणार आहे.

Pramod Yadav

Dice Portrait Of Lord Rama In Goa: अयोध्‍येत होणार्‍या रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्‍याचा जोश संपूर्ण देशाबरोबरच गोव्‍यातही वाहू लागलेला आहे. याच सोहळ्‍याचे निमित्त साधून कापशे-सावर्डे येथे 50 हजार फाशांचा (डाईस) वापर करुन श्रीरामाची प्रतिमा तयार करण्‍यात संपूर्ण गाव मग्‍न झाला.

गोव्‍यातील प्रसिद्ध असे डाईस शिल्‍पकार प्रदूल सांगेकर यांनी हा उपक्रम हाती घेतला असून ही प्रतिमा जेव्‍हा पूर्ण होईल तेव्‍हा डाईस चित्र क्षेत्रातील आशियाई विक्रमही माेडीत निघणार आहे.

लहान मुले सापशिडी खेळताना वापरणार्‍या फाशांचा ज्‍याला काेकणीत ‘गडगडा’ असे म्‍हणतात, त्‍याचा वापर ही श्रीराम प्रतिमा तयार करण्‍यासाठी होत असून या उपक्रमात गावचे तरुण आणि अन्‍य लोकही सहभागी होत आहेत.

मागचे काही दिवस सायंकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत लोक येऊन या श्रीराम प्रतिमेचे फासे बसवत आहेत. त्‍यामुळे सावर्डे गावात हाही एक उत्‍सव बनला आहे. बजरंग दलाच्‍या स्‍थानिक कार्यकारिणीने हा उपक्रम हाती घेतला आहे. काल या कलाकारांची फातोर्डेचे माजी आमदार दामू नाईक यांनी भेट घेऊन त्‍यांचा उत्‍साह वाढविला.

हा उपक्रम हाती घेणार्‍या प्रदूल सांगेकर यांनी यापूर्वी फाश्‍‍यांचा वापर करुन प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांची प्रतिमा बनवली होती. ही प्रतिमा बनविल्‍यानंतर त्‍याचे नाव सर्वत्र झाले होते.

या प्रतिमेचे दस्‍तूरखुद्द नरेंद्र माेदी यांनीही कौतुक केले होते. त्‍यानंतर 30 हजार फाश्‍‍यांचा वापर करुन प्रदूलने माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रतिमा बनविली हाेती. या प्रतिमेमुळे त्‍यांचे नाव इंडिया बुक ऑफ रिकॉर्डस्‌मध्‍ये समाविष्‍ट झाले होते.

प्रदूल हा व्‍यवसायाने एमआयटी तंत्रज्ञ असून केपे आणि सांगे येथील आरोग्‍य केंद्रात तो आपली सेवा देतो. वेगवेगळ्‍या प्रकारची चित्रकला हा त्‍यांचा छंद असून चित्रकलेच्‍या क्षेत्रात काहीतरी वेगळे करुन दाखवायचे आहे याच उद्देशाने आपण डाईस चित्रकला या प्रकाराकडे वळलो.

यू-ट्यूबवरील व्‍हिडिओज पाहून आपण आपली कला विकसित केली. सुरुवातीच्‍या आपल्‍या काही कलाकृती बिघडल्‍या. मात्र नंतर ही कला आपल्‍याला चांगल्‍यापैकी अवगत झाली असे प्रदूलने सांगितले.

प्रदूल हा पानावर चित्रे काढण्‍यासही मशहूर असून आतापर्यतं त्‍याने अशा कित्‍येक कलाकृती साकारल्‍या आहेत. आपल्‍याला या कलेतून एक दिवस गिनीज बुक जागतिक विक्रमामध्‍ये स्‍थान मिळवायचे आहे असे त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

Goa Film Industry: सरकारला फक्त ‘इव्हेन्ट’ हवेत, गोव्यात चित्रपट तरावा, अशी इच्छा नाही..

Horoscope: नोकरीचा शोध आता संपणार, कुंभसोबत 'या 2' राशींचं नशीब उजळणार

Narve Masandevi Jatra: 100 हून अधिक वर्षांचा इतिहास असणारी, दिवसाच भरणारी नार्वेतील 'मसणदेवीची जत्रा'; Watch Video

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT