Pope Francis India Visit Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: 'त्यांनी गोव्यासाठी पाठवले अनेक आशीर्वाद' ; व्हॅटिकन धर्मगुरुनंतर पोप फ्रान्सिस भारतात येण्याची शक्यता वाढली

Pope Francis India Visit: व्हेनेझुएलाचे मुख्य बिशप एडगर पेना पर्रा यांनी पोप फ्रान्सिसना भारताबद्दल तसेच गोव्याबद्दल असलेल्या नितांत प्रेमाविषयी भाष्य केले

Akshata Chhatre

पणजी: व्हॅटिकनहून काही धर्मगुरू बुधवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शवप्रदर्शन सोहळ्याला उपस्थित राहिले. यावेळी झालेल्या चर्चेत व्हेनेझुएलाचे मुख्य बिशप एडगर पेना पर्रा यांनी पोप फ्रान्सिसना भारताबद्दल तसेच गोव्याबद्दल असलेल्या नितांत प्रेमाविषयी भाष्य केले. सध्या गोव्यात सुरु असलेल्या पवित्र अवशेष प्रदर्शन सोहळ्याला त्यांनी अनेक आशीर्वाद पाठवले आहेत असेही मुख्य बिशप म्हणाले.

गोवा आणि दमणचे मुख्य बिशप कार्डिनल फिलिप नेरी फेराओ यांनी गोव्याचे राज्यपाल पिल्लई केंद्र सरकारच्या माध्यमातून पोप यांना अधिकृत निमंत्रण पाठवतील असा विश्वास व्यक्त केला.

पोप फ्रान्सिस यांनी भारतात यावं म्हणून राज्यपालांनी मुख्य भूमिका बजावली पाहिजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पोप फ्रान्सिस भारतात येण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचं मुख्य बिशप फिलिप नेरी फेराओ म्हणाले आहेत.

होली सी शिष्टमंडळाने गोव्याला दिलेली भेट ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे, असं म्हणत कार्डिनल फेराओ यांनी व्हॅटिकनहून आलेल्या धर्मगुरूंचे आभार मानले. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र शवप्रदर्शनाच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अत्यंत मोलाची असल्याचं ते म्हणाले.

यासोबतच राज्यपाल पिल्लई यांनी देखील धर्मगुरूंच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले आणि ही भेट गोव्यासाठी नक्कीच ऐतिहासिक असल्याने गोमंतवासियांना धर्मगुरूंना भेटण्याची एक अनोखी संधी मिळाल्याचं पिल्लई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT