POP Ganesh Idols Dainik Gomantak
गोवा

POP Ganesh Idols: दीड दिवसाची पुनरावृत्ती पाचव्या दिवशीही! विसर्जनानंतर बाप्पाच्या मूर्तींचे भग्नावशेष किनाऱ्यांवर

पीओपीच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने त्या तशाच तरंगत राहतात

Kavya Powar

POP Ganesh Idols: प्रदूषण रोखण्यासाठी राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात येऊन सुद्धा पीओपीच्या मूर्तींची विक्री केली जात होतीच. याचा परिणाम दिसून आला घरगुती गणेश विसर्जनानंतर.

पीओपीच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने त्या तशाच तरंगत राहतात आणि आपल्या मनमोहक बाप्पाचे विद्रूप चित्र आपल्याला पहावे लागते. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.

कोलवा किनाऱ्यावर दीड दिवसाच्या आणि पाच दिवसाच्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती किनारपट्टीवर वाहून आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा राज्यातील पीओपीच्या मूर्ती विक्री आणि खरेदीचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.

सध्या गणपती सुट्टीनिमित्त राज्यात पर्यटकांची आणि सणाला आलेल्यांची गर्दी वाढली आहे. त्यातच किनाऱ्यावर गणेशमूर्तींचे भग्नावशेष दिसत असल्याने अनेकांच्या धार्मिक भावना दुखावत आहेत.

सरकारने वारंवार सांगूनही नागरिक पीओपीच्या मूर्ती खरेदी करतात, हा चिंतेचा विषय बनला आहे. याबाबत कोलवाचे पंच मिनिनो फर्नांडिस म्हणाले की, सणानंतर मूर्तीचे असे रूप पाहायला मिळणे अतिशय वाईट आहे. यामुळे भक्तांच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे, किनाऱ्यावर वाहून आलेल्या मूर्ती पुन्हा खोल समुद्रात सोडणे गरजेचे असून लवकरच ते केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT