Goa Government Job Fraud canva
गोवा

Pooja Naik Case: 'पूजा नाईक'ने केली दोघांची नावे उघड! 'कॉल डिटेल्स'वरती लक्ष; एक कक्षाधिकारी रडारवर

Goa Job Scam: सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणारी ठकसेन पूजा नाईक हिच्याशी दोघा सरकारी अधिकाऱ्यांचा संबंध असून तेच तिला नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मदत करत होते, याचा पर्दाफाश झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pooja Naik Government Job Scam Case

पणजी: सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणारी ठकसेन पूजा नाईक हिच्याशी दोघा सरकारी अधिकाऱ्यांचा संबंध असून तेच तिला नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मदत करत होते, याचा पर्दाफाश झाला आहे. या अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल्सची माहिती पोलिसांनी जमा करण्यास सुरुवात केली आहे.

त्यातील एक अधिकारी हा निवृत्त झाला आहे, तर एकजण अजूनही सरकारी सेवेत आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात संशयित पूजा नाईक हिच्याशी असलेले लागेबांधे याची सविस्तर माहिती हाती आल्यावर त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल, अशी माहिती पोलिस ‘कॉल डिटेल्स’ची चौकशी सुरू सूत्रांनी दिली.

वर्षापूर्वी उकळले दोन लाख रुपये

नोकरीचे आमिष दाखवून पूजा हिने फसवणूक केल्याची एक तक्रार वर्षांपूर्वी डिचोली पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. पूजा हिने नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये उकळले होते. ''जॉब स्कॅम''प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईकला अटक केली होती. आज (मंगळवारी) फोंडा येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. पूजाची जामिनावर सुटका होताच डिचोली पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दीपश्रीलाही झाली होती यापूर्वी अटक

जॉब स्कॅमप्रकरणी फोंडा पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केलेली प्रमुख संशयित दीपश्री सावंत गावस हिलाही दोन वर्षांपूर्वी ''जॉब स्कॅम''प्रकरणी डिचोली पोलिसांनी अटक केली होती. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

पूजाच्या मोबाईलमध्ये दडलंय काय?

पूजा नाईकचा मोबाईल संच जप्त केला असून त्यामध्ये काही अधिकारी तसेच राजकीय कार्यकर्त्यांचेही मोबाईल क्रमांक आहेत.

त्यांचा या सरकारी नोकऱ्यांशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

तिच्या घरावरील छाप्यावेळी ज्या उमेदवारांचे अर्ज सापडले आहेत, त्यांना पोलिस चौकशीवेळी सहकार्य करण्यासाठी समन्स पाठवण्यात येणार आहेत.

उत्पन्नाचा कोणताच स्रोत नसताना पूजा नाईक हिने गेल्या काही वर्षांत जमा केलेली माया यासंदर्भातही चौकशी केली जात आहे.

आज डिचोली न्यायालयात हजर करणार

नोकरी विक्रीप्रकरणी फोंडा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटका केलेल्या पूजा नाईक हिला आता डिचोली पोलिसांनी अन्य एका फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. (ता. ३०) पूजा हिला रिमांडसाठी डिचोलीच्या प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पॉवरफुल्ल अधिकाऱ्याची चर्चा

दोन अधिकारी यात गुंतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी उघड केल्यानंतर अधिकारीवर्गात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एक कक्षाधिकारीही याबाबत ‘पॉवरफुल्ल’ असल्याची चर्चा आहे. यामुळे एका कक्षाधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर तो अधिकारी कोण, याविषयी अधिकारीच अंदाज वर्तवू लागले आहेत.

‘त्या’ वशिल्याच्या तट्टूंंची नावे केली उघड

पूजाने पैसे घेऊन काहीजणांना नोकऱ्या दिल्या आहेत आणि ते सध्या सरकारी सेवेत आहेत, याची माहिती दिली आहे. तिने सध्या दोघांची नावे उघड केली आहेत, त्याची माहिती मिळवण्यात येत आहे. त्यांनाही चौकशीस बोलावले जाईल. त्यामुळे त्यांचेही धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT