Pooja Naik  Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik News: ..10 दिवसांत सत्य समोर येईल! 'पूजा नाईक' प्रकरणी मोठा खुलासा; दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण

Cash For Job: आम्हाला सुरक्षा संहितेनुसार १४ दिवस मिळाले आहेत. या काळात या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईल, असे क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्‍य आरोपी पूजा नाईक हिने केलेल्‍या काही दाव्‍यांमध्‍ये तथ्‍य नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आम्हाला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार १४ दिवस मिळाले आहेत. या काळात या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईल, असे क्राईम ब्रँचचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी बुधवारी स्पष्ट केले.

परंतु, या प्रकरणातील मंत्री, आयएएस अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याचे नाव उघड करण्यास त्यांनी नकार दिला. पूजा नाईकला सुरुवातीला अटक केल्‍यानंतर तिने क्राईम ब्रँचकडे नोंदवलेल्‍या जबाबात कुणाचेही नाव घेतलेले नव्‍हते.

आता काही जणांवर आरोप केल्‍यानंतर क्राईम ब्रँचला तिने जो जबाब दिला आहे, त्याची ‍पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपासासाठी आम्‍हाला जो चौदा दिवसांचा कालावधी मिळाला आहे, त्‍यातील चार दिवस संपले आहेत. दहा दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल, असे राहुल गुप्ता म्हणाले.

फ्लॅटसंदर्भातील माहितीबाबत संभ्रम

पूजाने याआधी दिलेल्या जबाबात अधिकारी आणि अभियंत्याला ज्या फ्लॅटमध्ये पैसे दिले होते, त्याचा संदर्भ दिला होता; पण पोलिसांनी त्या फ्लॅटमालकाची चौकशी केल्यानंतर संबंधित फ्लॅटमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी राहात असल्याचे समोर आल्‍यामुळे पूजाने केलेल्या दाव्यांबाबत संभ्रम आहे.

...तर दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी!

पूजा नाईकने याप्रकरणी मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंत्याचे नाव घेतले आहे; परंतु यातील मंत्र्याला पैसे दिल्याचे तिने सांगितलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात सत्यता आढळल्यास सरकारच्या परवानगीने संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे राहुल गुप्ता यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर पडणार; BCCIकडे केली विनंती, काय आहे नेमकं कारण?

Goa Farmers Loan Scheme: शेतकरी, मच्छिमारांसाठी महत्वाची बातमी! 4% व्‍याजाने पाच लाखांपर्यंतचे कर्ज; अधिसूचना जारी

Highest Airfield in India: अद्भुत! 13700 फूट उंची, चीनपासून जवळच; देशातील सर्वात उंचीवरील 'हवाईतळ' कार्यान्वित

गोव्याची सैर की जिवाशी खेळ? हरमल बीचकडे जाणाऱ्या रस्त्यावर पर्यटकांची स्टंटबाजी, चालत्या कारच्या दरवाज्यावर बसून डान्स

Konkani Drama Competition: कल्पकतेचे साक्ष देणारे, विलक्षण अनुभूतीचे नाट्य 'भोगपर्व'

SCROLL FOR NEXT