Goa job scam case Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

DGP Alok Kumar statement: पूजा नाईक हिने आपल्या जबानीत अनेक मंत्री, अधिकारी आणि अभियंत्यांची नावे घेऊन मोठी खळबळ उडवून दिली होती

Akshata Chhatre

पणजी: नोकऱ्यांच्या काळ्या बाजारातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पूजा नाईक हिच्या प्रकरणात गुन्हे शाखेने अद्याप एफआयआर (FIR) नोंदवलेला नाही. १५ दिवसांच्या तपासानंतरही नाईक हिच्या जबानीची पुष्टी करणारे पुरावे न सापडल्याने गुन्हे शाखेने पुढील तपास थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संकेत मिळत आहेत.

'आरोप खरे आढळले नाहीत' - डीजीपी

पूजा नाईक हिने आपल्या जबानीत अनेक मंत्री, अधिकारी आणि अभियंत्यांची नावे घेऊन मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणावर बोलताना पोलीस महासंचालक (DGP) आलोक कुमारयांनी माहिती दिली.

डीजीपी म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी अजूनही सुरू आहे आणि लवकरच ती पूर्ण होईल. "आतापर्यंत, तिने केलेले आरोप खरे असल्याचे आढळले नाही," असे स्पष्ट विधान त्यांनी केले आणि एकदा चौकशी पूर्ण झाल्यावर, आम्ही सविस्तर माहिती देऊ," असेही त्यांनी नमूद केले.

जबानीत विसंगती; पुरावेही मिळेनात

गुन्हे शाखेच्या सूत्रांनुसार, एफआयआर नोंदवला न जाण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पूजाने दिलेल्या जबानीत विसंगती आढळली आहे. पोलिसांनी गेल्या वर्षी तिला अटक झाल्यावर दिलेली माहिती आणि आता दिलेली माहिती तपासून पाहिली आहे.

तिने दिलेल्या माहितीची पुष्टी करणारे कोणतेही ठोस पुरावे पोलिसांना तपासानंतरही सापडलेले नाहीत.त्यामुळे, जबानीत विसंगती आणि पुराव्यांचा अभाव असल्याने या प्रकरणात एफआयआर नोंदवून तपासकाम पुढे नेण्याचा निर्णय गुन्हे शाखेने घेतलेला नाही, हे स्पष्ट होते. पूजा नाईक प्रकरणाची चौकशी आता अंतिम टप्प्यात असून, तिच्या आरोपांची सत्यता सिद्ध न झाल्याने हे प्रकरण थंडावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT