Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: 'हा तर सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न...' पूजा नाईकच्या आरोपांवर काय म्हणाले आमदार मायकल लोबो?

Michael Lobo Statement: पूजाकडून करण्यात आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार मायकल लोबो यांनी हे आरोप गोव्यातील लोकांसाठी अविश्वसनीय असल्याचे म्हटले.

Manish Jadhav

Goa Cash For Job Scam: 'कॅश फॉर जॉब' प्रकरणी आरोपी पूजा नाईक सातत्याने नव-नवे खुलासे करत आहे. नुकत्याच केलेल्या खुलाशात तिने थेट राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह काही अधिकाऱ्यांची नावे घेऊन गंभीर आरोप केले. यातच आता, पूजाकडून करण्यात आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार मायकल लोबो यांनी हे आरोप गोव्यातील लोकांसाठी अविश्वसनीय असल्याचे म्हटले. तसेच, या आरोपांमागे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

आरोपांवर लोबोंची प्रतिक्रिया

आमदार लोबो म्हणाले, "अनेक महिने उलटून गेल्यानंतर आता पूजा नाईकने एक नवीन कहाणी समोर आणली आहे. ही कहाणी अनेक गोवेकरांना खरी वाटेल, यावर माझा विश्वास नाही."

लोबो यांनी पूजाला तिच्या आरोपांसंदर्भात पुरावे सादर करण्याचे आवाहन केले. लोबो म्हणाले, "पूजाने जे काही आरोप केले आणि ज्यांची नावे घेतली त्या सर्व आरोपांचे तिने पुरावे सादर करावेत. पुराव्याशिवाय केलेले आरोप गंभीर मानले जाऊ शकत नाहीत''

सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न?

तसेच, या आरोपांमागे कोणाचा हात आहे किंवा काय उद्देश आहे याबद्दल लोबो यांनी शंका व्यक्त केली. लोबो म्हणाले, "कोणीतरी जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावा." नोकरी घोटाळ्यावरुन होणारे आरोप-प्रत्यारोप पाहता यामागे काही राजकीय हेतू असू शकतो का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोबो यांच्या वक्तव्याने या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.

तपासावर विश्वास

या प्रकरणाच्या तपासावर आपण विश्वास ठेवत असल्याचे आमदार लोबो यांनी सांगितले. ते म्हणाले, "आता या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी त्यांचे काम सुरु ठेवावे."

लोबो यांनी अशी आशा व्यक्त केली की, पोलीस तपासातून या प्रकरणातील सत्य आणि आरोपी पूजा नाईकच्या आरोपांमागील सत्यता लवकरच समोर येईल. त्यांनी गोव्यातील जनतेलाही अशा अविश्वसनीय कथांवर लगेच विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT