Ravi Naik on proposed Ponda District 
गोवा

'फोंडा गोव्यातील तिसरा जिल्हा होणार'

रवी नाईकांचं मोठं वक्तव्य, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचाही दावा

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा लवकरच गोव्यातील तिसरा जिल्हा होणार आहे, असं वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी केलं आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्याला तसं आश्वासन दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. फोंडा परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Ravi Naik News Updates)

रवी नाईक यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. गोवा विधानसभा निवडणूक, खाणप्रश्न, मायकल लोबो काँग्रेसप्रवेश, फोंडा (Ponda) जिल्हा आदी विषयांवर आपलं मत व्यक्त केलं. फोंडा जिल्हा झाल्यास त्याचा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे. गरीब नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी जाण्यास मोठी अडचण होते. फोंडा तिसरा जिल्हा झाल्यास प्रशासनाचा ताण कमी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे,

दरम्यान भाजप आगामी विधानसभा (Goa Assembly Election) निवडणुकीत 40 पैकी 27 जागा मिळवेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वामध्ये भाजप गोव्यात जोरदार मुसंडी मारेल. त्यामुळे भाजप सोडून गेलेल्या लोकांमुळे पक्षाला कोणताही धोका नाही. उलट फायदाच असल्याचं त्यांनी सांगितलं. खाण पट्ट्यात असलेल्या नाराजीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रवी नाईक म्हणाले, की खाण अवलंबितांमध्ये कोणतीही नाराजी नाही. ते येत्या निवडणुकीत भाजपच्याच (BJP) बाजूने उभे राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT