TV Dish Dainik Gomantak
गोवा

Ponda: फोंड्यात केबलच्या तुटक प्रक्षेपणाला लोक वैतागले; तक्रारी देऊनही 'येरे माझ्या मागल्या'

Ponda: फोंड्यात केबलच्या प्रक्षेपणात वारंवार खंड पडत असल्यामुळे केबल ग्राहक त्रस्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

Ponda: सध्या फोंड्यात केबलच्या प्रक्षेपणात वारंवार खंड पडत असल्यामुळे केबल ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेक तक्रारी देऊन सुद्धा काहीच उपयोग होत नसल्याने लोक वैतागले आहेत. हवे तेवढे चॅनल्स घेण्याची मुभा असली तरी जे चॅनेल्स घेतात तेही सारखे बघायला मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

एखादा आवडीचा कार्यक्रम बघायला बसले की मध्येच ‘बॅड ऑर नो सिग्नल कॉन्टॅक्ट केबल ऑपरेटर’ असा संदेश येतो. मग कधी कधी तुटक तुटक प्रक्षेपण तर कधी प्रक्षेपणच गायब असा प्रकार वारंवार येतो. संपर्क साधल्यास मेकॅनिक येतो खरा; पण तो गेल्यावर परत ‘येरे माझ्या मागल्या’चा प्रत्यय येतो.

गेले आठ दिवस असे वारंवार घडत असून याबाबत केबल ग्राहकांना कोणच वाली नसल्याचे दिसत आहे. महिन्याचे पैसे देण्यास एक दिवस जरी उशीर झाला तरी लगेच सेवा बंद करण्यात येते. आता पैसे भरूनही जर अशी सेवा मिळत असेल तर ती सेवा काय कामाची असे लोक बोलताना दिसतात.

सध्या केबल सेवेला डिश अँटेनाचा पर्याय उपलब्ध आहे. पण त्या सेवेत स्थानिक वाहिन्या मिळत नसल्यामुळे ग्राहक केबल सेवेला प्राधान्य देतात; पण आता या सेवेला वैतागलेल्या ग्राहकांना केबलला राम राम ठोकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दिसायला लागले आहे.

याबाबत या सेवेच्या व्यवस्थापनाशी लोकांचे खटके उडतानाही दिसायला लागले आहेत. काही ग्राहकांनी परिस्थिती न सुधारल्यास केबल सेवेच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन व्यवस्थापनाला घेराओ घालण्याची तयारी सुरू केली आहे. खरं तर आता केबल सेवेची ‘डिश’सोबत जोरदार स्पर्धा असल्यामुळे केबल सेवेने आपला दर्जा वाढवायला हवा होता.

पण काळाची पावले न ओळखता येत असल्यामुळे ही सेवा अजूनही ‘जुन्या जमान्यात’ असल्यासारखी वाटते. ग्राहकांच्या सहनशक्तीचा आणखी अंत न पाहता ही सेवा विनाखंडित व दर्जेदार द्यावी, अशी मागणी फोंड्यातील केबल ग्राहकांकडून केली जात आहे.

सेवेत सुधारणा व्हायला हवी- पारकर

सध्याची फोंड्यातील केबल सेवा ही दर्जाहीन झाल्यासारखी वाटते. स्थानिक वाहिन्यांचे कार्यक्रम बघायला मिळावे म्हणून आम्ही ही सेवा ‘गोड’ मानून घेत आहोत. शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. ती मर्यादा ओलांडायला लागण्यापूर्वी या सेवेच्या व्यवस्थापनाने सेवेत सुधारणा करावी, असे केबल ग्राहक असलेल्या प्रशील पारकर यांनी गोमन्तकला सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT