Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Seized: बोरीत दोन टन गोमांस जप्त; वाळपईतील गोप्रेमीमुळे उघडकीस आला प्रकार

Animal activist in Valpoi uncovers beef racket: बोरी येथे ट्रक अडवण्यात आला व तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले, अशी माहिती मिळाली आहे.

Pramod Yadav

Goa police beef raid news: अवैध पद्धतीने वाहतूक केले जाणारे तब्बल दोन टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. बोरी पुल येथे गुरुवारी (१२ डिसेंबर) फोंडा पोलिसांनी ही कारवाई केली. आयशर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ साठवून त्याची वाहतूक केली जात असताना ही कारवाई करण्यात आली.

फोंडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोमांस भरलेला GA 08 V 3896 हा ट्रक पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. गोमांस कोठून आणले, यासाठी कत्तल कोठे करण्यात आली याची चौकशी सध्या पोलिस करत आहेत. जप्त केलेल्या ट्रकमध्ये तब्बल दोन टन गोमांस असल्याची माहिती समोर आली आहे. फोंडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

वाळपईतील गोप्रेमींमुळे उघडकीस आला प्रकार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळपईतील एका गोप्रेमीला GA 08 V 3896 या ट्रकमध्ये गोमांस असल्याचा संशय आला. काही गावकऱ्यांना सोबत घेऊन गोप्रेमींनी ट्रकचा पाठलाग केला. बोरी येथे ट्रक अडवण्यात आला व तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT