Police Arrested Suspect Dainik Gomantak
गोवा

चोरीचा ट्रक जप्त; फोंडा पोलिसांनी संशयिताला केली अटक

आंद्रे येथील कार्लोस आफोन्स यांनी आपला ट्रक चोरीला गेल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात केली होती.

दैनिक गोमन्तक

फोंडा: खांडोळा-माशेल येथून चोरीस गेलेला ट्रक संशयित चोरांसह पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले. सांत आंद्रे येथील कार्लोस आफोन्स यांनी आपला ट्रक चोरीला गेल्याची तक्रार फोंडा पोलिस स्थानकात केली होती. जीए 01 डब्ल्यू 6671 या क्रमांकाचा ट्रक 17 रोजी खांडोळा येथे ठेवला असता, 19 रोजी तो गायब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी खांडोळा येथील संशयित सागर दिलीप हळदणकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ट्रक चोरल्याची कबुली दिली.

हळदणकर याने हा ट्रक कोलवाळ येथील गॅरेजमध्ये ठेवल्याचे तसेच ट्रकचा मूळ क्रमांक बदलून तो जीए 05 बी 3157 असा केल्याचे निदर्शनास आले. पोलिस निरीक्षक विजयकुमार चोडणकर आणि उपअधीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक साजित पिल्ले, हेड कॉन्स्टेबल केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल रमेश झोरे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ट्रक जप्त करून हळदणकर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

SCROLL FOR NEXT