accused arrested for kidnapping child Dainik Gomantak
गोवा

महिलेसह एका वर्षाच्या मुलाला पळवण्याचा प्लान फसला

संशयिताला फोंडा पोलिसांनी कर्नाटकात जाऊन ठोकल्या बेड्या

दैनिक गोमन्तक

फोंडा : एक वर्षाच्या लहान मुलाला पळवल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी कुमटा - कारवार येथील बिलाल महंमद शेख याला ताब्यात घेतले. मूळ धारवाड - कर्नाटक येथील पण सध्या कारापूर - तिस्क येथे राहणाऱ्या रवी सिद्धप्पा सोनटक्की याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मुलाला पळवण्याचा हा प्रकार गेल्या मंगळवारी 17 मे रोजी घडला होता.

तक्रारदार रवी सोनटक्की याच्या पत्नीशी संशयित बिलाल शेख याचे सूत जुळल्याने त्याने रवी सोनटक्की याची पत्नी आणि त्यांच्या एका वर्षाच्या मुलासह कुमटा - कारवार येथे पळ काढला होता. बिलाल शेख हा मूळचा कुमटा - कारवार येथील असला तरी सध्या तो मुजावरवाडा - बाणस्तारी येथे राहत होता. रवी सोनटक्की याच्या तक्रारीवरून फोंडा पोलिसांनी बिलाल शेख याचा बाणस्तारी येथे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो कारवारला पळाला असल्याचे समजले.

या प्रकरणी फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक सूरज काणकोणकर आणि अन्य पोलिसांच्या पथकाने कुमटा येथे जाऊन संशयित बिलाल शेख आणि एका वर्षाच्या मुलाला हुडकून काढून ताब्यात घेतले. फोंडा पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील व निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधिक तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT