Ponda | Mobile Tower Dainik Gomnatk
गोवा

Ponda: भेडशे-तळावली परिसरात मोबाईल टॉवर नकोच! शाळा व्यवस्थापनाची स्पष्ट भूमिका

Ponda: मोबाईल टॉवर लहान मुलांना घातक ठरु शकतो, त्यामुळे तो येथून हटवून दूसरीकडे उभारा, अशी पालकांची मागणी आहे.

दैनिक गोमन्तक

Ponda: भेडशे-तळावली येथील प्राथमिक शाळेच्या आवारात मोबाईल टॉवर उभारण्याच्या कृतीचा पालक आणि शाळा व्यवस्थापनाने निषेध केला आहे. काल (रविवारी) झालेल्या बैठकीत महालक्ष्मी हायस्कूल तसेच पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळेच्या संघटनेतर्फे कोणत्याही स्थितीत शाळेजवळ हा मोबाईल टॉवर नकोच, अशी भूमिका घेतली आहे.

भेडशे - तळावली येथील प्राथमिक शाळेच्या जवळ तसेच महालक्ष्मी इंग्लिश हायस्कूलला लागून असलेल्या जमिनीत मोबाईल टॉवर उभारण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. हा मोबाईल टॉवर लहान मुलांना घातक ठरू शकतो, त्यामुळे तो येथून हटवून अन्यत्र उभारा, अशी पालकांची मागणी आहे.

चार दिवसांपासून हा विरोधाचा प्रकार सुरू आहे. पण पालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी फोंड्याचे मामलेदार तसेच पोलिस फौजफाटा आला, त्यामुळे सरकारी यंत्रणेला जबरदस्तीने हा टॉवर उभारायचा आहे, असे स्पष्ट होते, मात्र विद्यार्थ्यांना घातक ठरणारा हा टॉवर शाळेलगत नकोच, असा धोषा पालकांनी लावला. मोबाईल टॉवर उभारण्यासाठी अन्यत्र जागा असल्याने त्या ठिकाणी हा टॉवर उभारा,असे पालकांनी सांगितले.

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत शाळेजवळ हा टॉवर बांधण्याचे काम त्वरित रोखा आणि इतरत्र हा टॉवर उभारा अशा प्रकारचे एक निवेदन शिक्षणमंत्री, उपजिल्हाधिकारी तसेच इतर सर्व संबंधितांना देण्याचे ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ''भाजपला राज्यातील विरोधकांना संपवाचंयं, पण ते शक्य नाही...'', सरदेसाईंचा हल्लाबोल!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT