Paduka Pujan Dainik Gomantak
गोवा

Ponda Paduka Pujan: नरेंद्राचार्यांच्या सिध्द पादुकांचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Ponda: गोवा राज्यातील फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथे नरेंद्राचार्य महाराज सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Ponda Paduka Pujan: अनंत श्री विभूषित जगद्‌गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम उपपीठ गोवा सेवा मंडळाच्या वतीने नरेंद्राचार्य महाराज सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने गोवा येथील युनायटेड स्टेट्स क्लब मैदानावर पूजन व दर्शन सोहळ्याला हजारो भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

गोवा राज्यातील फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ येथे नरेंद्राचार्य महाराज सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता मंगेशी येथील देव मंगेश मंदिराकडून महाराजांच्या सिध्द पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मारुतीरायांचा देखावा सादर करण्यात आले.

तसेच भजनी मंडळ, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष व महिला यांच्या सह प्रत्येक तालुक्यातून विविध पथक हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले भाविक, भक्त, हितचिंतक मिरवणुकीत सामील झाले होते.

ही मिरवणूक कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता दाखल झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी नरेंद्राचार्य महाराजांच्या सिध्द पादुकांचे भव्य स्वागत केले.

या कार्यक्रमात 15 गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या सोहळ्यात नरेंद्राचार्य महाराजांच्या सिध्द पादुकांचे विधिवत गुरुपूजन करण्यात आले.

त्यानंतर प्रवचनकार साधनाताई शिंदे महाराज यांनी सुश्राव्य प्रबोधन केले. संध्याकाळी नरेंद्रचार्य महाराजांनी नवीन भाविकांना दीक्षा का घ्यावी, याचे महत्त्व पटवून देणारे सुश्राव्य असे प्रवचन केल्यानंतर भाविकांना उपासक दीक्षा दिली.

संध्याकाळी आरती करून श्रींच्या चरणावर पुष्पांजली अर्पण करून श्रींचे कृपार्शिवाद घेतले व गाऱ्हाणे घालून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT