Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : मंत्री गावडेंचे सरकारवर शरसंधान; हक्कासाठी आता आंदोलन हाच पर्याय

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, आत्तापर्यंत आदिवासी समाजातील लोकांचा राजकारणासाठी आणि मतांसाठी वापर करण्यात आला आहे. भूमिपुत्र असलेल्या या समाजातील लोकांनी हालअपेष्टा सोसून आपली संस्कृती जपली, आपले अस्तित्व राखून ठेवले.

त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे मात्र सरकार दरबारी दुर्लक्ष करण्यात येत आहे. ही निंदनीय बाब असून या न्याय्य मागण्यांसाठी आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी आज येथे जोरदारपणे केलेल्या भाषणात नमूद केले.

आदिवासी समाजाचे काम करणे जमत नसल्यास अधिकाऱ्यांनी पदे सोडावीत असा सज्जड दमही त्यांनी भरला. आदिवासी समाजाला आत्तापर्यंत संघर्षच करावा लागला असून यापुढे आणखी एका संघर्षाची तयारी समाजातील लोकांनी ठेवावी, अशीही पुस्ती गोविंद गावडे यांनी जोडली.

आदिवासी कल्याण संचालनालय आणि उटा यांनी आयोजित केलेल्या मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या स्मृतीनिमित्त प्रेरणादिनाच्या सरकारी कार्यक्रमात गावडे यांनी सरकारला बराच घरचा आहेर दिला. या खात्याचा ताबा असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. उटाचे अध्यक्ष प्रकाश शं. वेळीप यांनी जाहीरपणे त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.

फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिराच्या कला दालनात हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष, आमदार डॉ. गणेश गावकर, एससी एसटी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, आदिवासी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, व्हीपीकेचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, गावडा समाजाचे अध्यक्ष विश्‍वास गावडे तसेच आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

आमदार गणेश गावकर म्हणाले की, आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले सर्वस्व दिले, त्या सर्वांचे स्मरण करून सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याची गरज आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांना एकत्रित आणले, तर आदिवासी समाजाची ताकद अधिकच वाढेल, म्हणून पुढील काळात त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.

यावेळी वासुदेव मेंग गावकर, दीपक करमळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. उदय गावकर यांनी केले, तर खात्याचे अधिकारी सागर वेर्लेकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात खात्यातर्फे आदिवासी समाजातील लोकांसाठी विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही प्रकाशन

करण्यात आले.

‘समाजाने निद्रिस्त नव्हे, जागृत रहावे’

आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कामांची चालढकल करण्यासाठी कारणे दिली जात आहेत, नवनवीन योजना लागू करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही, आहे त्याच योजना पुढे केल्या जात आहेत, हे सर्व काही बदलण्याची आवश्‍यकता आहे. आता समाजातील लोकांनी निद्रिस्त नव्हे, तर जागृत राहण्याची आवश्‍यकता आहे, असे मंत्री गावडे म्हणाले.

गावडे म्हणाले,

आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

आदिवासी समाजाने संघर्षासाठी सज्ज व्हावे

पुढील वर्षीच्या प्रेरणादिनाच्या आधी आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.

आदिवासी भवनाचे कामही आदिवासी कल्याण खात्याने सुरू करावे.

नसती कारणे न देता काम अडवून ठेवू नये. जमत नसल्यास अधिकाऱ्यांनी पदे सोडावीत.

मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी

प्रकाश वेळीप यांनी आदिवासी कल्याण खात्याचा ताबा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थिती लावल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना आम्ही आमच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार होतो, पण ते आले नसल्याने यापुढे असे प्रकार टाळावेत, असे आवाहन केले. उटा संघटनेच्या कार्याची माहिती देताना उटाच्या संघर्षाबद्दलही त्यांनी उपस्थितांना अवगत केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT