goa trafficking racket busted Dainik Gomantak
गोवा

Human Trafficking: फोंड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, पीडित तरुणीची सुटका; पश्चिम बंगाल, यूपीतील 3 जणांना अटक

Ponda Goa Human Trafficking: फोंडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी रात्री एका मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत, एका पीडित तरुणीची सुटका केली

Akshata Chhatre

फोंडा: गोव्यात मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. फोंडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत शनिवारी (दि.३०) रोजी रात्री एका मोठ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत, एका पीडित तरुणीची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोलिसांकडून गणेश रेसिडेन्सी, फोंडा येथील खोली क्रमांक २०२ वर छापा टाकण्यात आला. पोलिसांना या ठिकाणची माहिती एका बनावट गिऱ्हाईकाद्वारे मिळाली होती. यावेळी एका स्वयंसेवी संस्थेची देखील मदत घेण्यात आली.

छाप्यात पोलिसांनी एका तरुणीला मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवले. पीडित तरुणीला आरोपींनी गोव्यात आणले होते आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाच्या मदतीने सापळा रचला आणि आरोपींना रंगेहात पकडले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

१. नजीम, वय ३३, ( रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल)

२. जमीदार, वय ३८, ( रा. पुरुलिया, पश्चिम बंगाल)

३. राजेश गौड, वय ४९, (रा. पर्वरी, गोवा मूळ रा. आझमगढ, उत्तर प्रदेश)

पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १४३ सह ३(५) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्या संदर्भात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, अशा प्रकरणांमध्ये आवश्यक असलेली सर्व कार्यवाही पूर्ण करून ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT