Usagao Accident  Dainik Gomantak
गोवा

Usgao Accident: दुर्दैवी! अपघातानंतर दुचाकीस्वार हवेत उडाला, उसगावात तरुणाचा मृत्यू

Goa news updates: उसगावमधील खुरसाकडे येथे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा गोमॅको रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : उसगावमधील खुरसाकडे येथे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा गोमॅको रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशांत घाडी (वय २५) असे या तरुणाचे नाव असून तो उसगावमधील एका कंपनीत सुपरव्हायजर म्हणून काम करत होता.

खुरसाकाडे येथे मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास अंगावर काटा आणणारा अपघात घडला. प्रशांतच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. हा अपघात ऐवढा भीषण होता की धडकेनंतर प्रशांत हवेत उडाला आणि जमिनीवर आपटला. गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोमॅकोत त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान प्रशांतची प्राणज्योत मालवली. प्रशांत हा फोंड्यावरून उसगावच्या दिशेने जात होता. तर कार उसगाववरून फोंड्याच्या दिशेने येत होती.

या अपघातात प्रशांतच्या मागून दुचाकीवरून येणारा आणखी एक प्रवासी जखमी झाला. सूरज नाईक असे या जखमीचे नाव असून त्याला देखील किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.

अपघात ज्या ठिकाणी घडला तिथे गेल्या सहा महिन्यातील हा चौथा मोठा अपघात आहे. या अपघातात आत्तापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिक करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT