Deepashri Sawant Police Custody Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

Deepashri Sawant Police Custody: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंतच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Manish Jadhav

Deepashri Sawant Police Custody: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या दीपश्री सावंतच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. फोंडा न्यायालयाने दीपश्रीला पुन्हा एकदा झटका दिला. न्यायालयाने दीपश्रीला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दीपश्रीची 14 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाकडे पुन्हा एकदा दीपश्रीच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयानेही पोलिसांनी केलेली मागणी रास्त ठरवत दीपश्रीची पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, पोलिसांनी दीपाश्रीकडून तीन कार आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, सरकारी नोकरीच्या आमिषातून कित्येकांनी आयुष्याची कमाई दीपश्रीच्या घशात घातली. दीपश्रीने मात्र त्यांना नोकरीच्या नावाखाली आश्वासनांची खैरात वाटली. नोकरीसाठी लोकांकडून उकळलेल्या लाखो रुपयांतून तिने स्वत:चे उखळ पांढरे करतानाच मुक्त हस्ताने देवधर्मही केला.

गावातील देवीला दागिने अर्पण करतानाच तिने वारकरी मंडळालाही देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे. सरकारी नोकरीसाठी अनेकांना लाखो रुपयांना टोपी घालणाऱ्या दीपश्रीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे.

दुसरीकडे, पोलिस कोठडीत दीपश्री रोज नव-नवे खुलासे करत आहे. आतापर्यंत किती लोकांना गंडा घातला या माहितीबरोबच दीपश्रीचे राजकीय कनेक्शनही पोलिस शोधतायेत. राजकीय कनेक्शनशिवाय दीपश्री एवढा मोठा गंडा घालूच शकत नाही असा पोलिसांना संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT