Bison, Gaur Canva
गोवा

Bison In Ponda: फोंडा शहरात गव्यांचा मुक्त संचार! रहिवाशांत भीतीचे वातावरण, त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

Bison In Goa: फोंडा शहरात आता दिवसाढवळ्या गवे भटकंती करू लागले असून थेट रस्त्यावरून आत गल्लीबोळात गवे दिसू लागल्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Sameer Panditrao

Bison Sighting In Ponda Goa

फोंडा: फोंडा शहरात आता दिवसाढवळ्या गवे भटकंती करू लागले असून थेट रस्त्यावरून आत गल्लीबोळात गवे दिसू लागल्यामुळे रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

अचानकपणे गवे फोंडा शहर तसेच ढवळी भागात दिसू लागल्यामुळे या गव्यांच्या हल्ल्याची भीती स्थानिकांना लागून राहिली असून वन खात्याने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दहा दिवसांपूर्वी फोंडा बसस्थानक तसेच वरचा बाजार भागात एका भल्या मोठ्या गव्यांचे दर्शन रात्रीच्यावेळी लोकांना झाले होते. त्यानंतर याबाबतची माहिती वन खात्याला दिल्यानंतर खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या गव्याला शांतीनगर - फोंडा भागातून रानात पिटाळले होते. पण आता गवे पुन्हा एकदा फोंडा आणि ढवळी परिसरात दिसू लागल्यामुळे खुलेआम भटकणाऱ्या या गव्यांमुळे लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ढवळी येथील मुख्य रस्त्यावर एका भल्या मोठ्या गव्याची भटकंती काल दिसून आली. त्यापूर्वी वरचा बाजार फोंडा भागातही असाच एक गवा भटकत होता.

ढवळी येथील मुख्य रस्त्यावरून हा गवा रेडा देवस्थानच्या घुमटीजवळून येथील रहिवासी कॉलनीत घुसला, त्यानंतर तो गायब झाला. विशेष म्हणजे यावेळी रहिवासी कॉलनीत एक मुलगा चालत आपल्या घरी जात असताना त्याच्या मागून येणारा गवा रेडा त्याला दिसला नाही. मात्र या मुलाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने धूम ठोकल्याने तो बचावला.

बेतोडा-कुर्टीत गवे

बेतोडा तसेच कुर्टी भागातील डोंगरावरील रानातून हे गवे रेडे फोंडा शहरात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. बेतोडा भागात दोन महिन्यांपूर्वी एका महिलेला गव्याने शिंग खुपसून ठार मारले होते. बेतोडा तसेच कुर्टी भागात डोंगरावरील रानातून हे गवे लोकवस्तीत खाण्याच्या उद्देशाने येत आहेत. मागच्या काळात कुर्टी भागात गवे कळपाने फिरत असल्याचे दिसले होते, त्यानंतर केरी, खांडेपार, बेतोडा भागात खुले आम गव्या रेड्यांनी हैदोस घालून लोकांची केळी तसेच इतर बागायतीत उच्छाद मांडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT