Sattari News Dainik Gomantak
गोवा

Sattari News: उस्ते बंधारा परिसरात 'स्वच्छ भारत अभियान'चे तीन तेरा, नदीकिनारी बाटल्याची तोडफोड सुरुच

पर्यटकांकडून नदीत दारूच्या बाटल्यांचा खच

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari News सत्तरी तालुक्याच्या नगरगाव पंचायतीतील उस्ते बंधारा परिसरात पर्यटकांकडून नदी परिसर गलिच्छ करण्याचा प्रकार वाढत चालला आहे.

काही दिवसांपूर्वी उस्ते ग्रामस्थांनी नदीच्या ठिकाणी बंधाऱ्यावर आंघोळीसाठी आलेल्या पर्यटकांना परिसरात कचरा टाकताना चांगलेच धारेवर धरले होते.

पंचायत सरपंच, उपसरपंच व इतर ग्रामस्थांनी मिळून बंधारा परिसराची स्वच्छता केली होती. तसेच दोन दिवस पोलिसांद्वारे याठिकाणी पाळत देखील ठेवण्यात आली होती.

मात्र आता पुन्हा या ठिकाणी पर्यटकांचा धुमाकुळ सुरूच आहे. नदीच्या बंधारा परिसरात दारु पिऊन रिकाम्या बाटल्या, खाद्य पदार्थांचे प्लास्टिक फेकण्यात आल्या असून काही समाजकंटकांनी नदीकाठी बाटल्या फोडून काचेचे तुकडे सर्वत्र फेकले आहेत.

दरम्यान काल नदीकिनारी गेलेल्या एका युवकाच्या पायात काच घुसून त्याला गंभीर दुखापत देखील झाली होती. त्यामुळे पुन्हा उस्ते बंधारा परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या ठिकाणी पर्यटकांना थारा देऊ नये अशी मागणी ग्रासम्थांनी पंचायतीकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanju Samson Record: 7 चौकार अन् 4 षटकार! 20 चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकत संजूची हिटमॅनच्या क्लबमध्ये एन्ट्री; टीकाकारांचीही केली बोलती बंद

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

SCROLL FOR NEXT