Basavaraj Bommai Dainik Gomantak
गोवा

Politics: महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगाव दौरा घोषित करताच; कर्नाटकच्या नाकाला झोंबल्या मिरच्या

Politics: सध्या दोन्ही राज्यांत तणावाची स्थिती असल्याने या काळात मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये, असे बोम्मई यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Politics: महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगाव दौरा घोषित करताच कर्नाटकच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. ‘सध्या दोन्ही राज्यांत तणावाची स्थिती निर्माण झाली असल्याने या काळात मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये,’ या आशयाचे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे पाठविल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बोम्मई काल बेळगाव दौऱ्यावर आले होते. रामदुर्गमधील कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तणावपूर्ण परिस्थितीचा दाखला दिला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी समन्वय समितीचे सदस्य मंत्री चंद्रकांत पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि सीमाप्रश्‍न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने येत्या 6 डिसेंबरला मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर येतील.

तसेच, या दौऱ्याची माहिती कर्नाटकाच्या मुख्य सचिवांना पाठविली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘वाय’ दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. त्याला कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी उत्तर पाठविले आहे. फॅक्सद्वारे दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला भेट देणे योग्य नाही.’

चंद्रकांत पाटील सहाला बेळगावात

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला असताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 6 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा 3 डिसेंबरला ठरलेला असताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांमध्ये झालेल्या चर्चेनुसार 6 डिसेंबरला त्याचे नियोजन आखण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांचा 3 डिसेंबरचा बेळगाव दौरा निश्चित झाला होता. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील त्याचदिवशी बेळगावमध्ये आहेत.

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

मराठी भाषकांशी चर्चा करण्यासाठी 6 डिसेंबरला बेळगावला जाणार आहे. आम्हाला संघर्ष करायचा नाही. तुम्ही कशासाठी संघर्ष वाढवीत आहात. उगाच धमक्या देऊ नका. तुम्ही बंदी घातल्याने आम्ही थांबणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT