Goa ST Reservations Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservations: बहुप्रतिक्षित राजकीय आरक्षण विधेयक आज संसद पटलावर?

Political Reservation: गोव्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या विधेयकाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, ता. ४ (प्रतिनिधी) : गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी (एसटी) विधानसभेत राजकीय आरक्षण देण्याबाबत सोमवारी (ता.५) लोकसभेत बहुप्रतिक्षित विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक संसदेत मांडतील. गोव्यातील एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या विधेयकाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हे विधेयक लोकसभेत मांडले जाणार असल्याने गोव्यातून एसटी समाजाचे ‘उटा’ संघटनेचे नेते प्रकाश वेळीप, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, विश्‍वास गावडे आणि दुर्गादास गावडे यांचे शिष्टमंडळ दिल्लीला रवाना झाले आहे. याविषयी वेळीप यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले की, हे विधेयक मांडले जाईल, अशी आम्हाला आशा आहे.

गोवा राज्य विधानसभा मदारसंघांमध्ये अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्रचना विधेयक २०२४ लोकसभेत सादर केले जाणार आहे. गोवा राज्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) यादीत काही समुदायांचा समावेश करून पुनर्संरचना करणे आवश्यक आहे, असे या विधेयकात म्हटले आहे.

गोव्यात अनुसूचित जमातींची संख्या अनुसूचित जातींपेक्षा पाचपट जास्त आहे; परंतु त्यांच्यासाठी विधानसभेत एकही जागा राखीव नाही. फक्त एससी समाजासाठी एक मतदारसंघ राखीव आहे. ही विसंगती दूर करण्यासाठी एसटी समाजाकडून मतदारसंघ आरक्षणाची मागणी केली जात आहे.

२००१ सालच्या जनगणनेवर आधारित २००२ च्या परिसीमनादरम्यान गोव्यातील एसटींसाठी कोणतीही जागा निश्चित केली नव्हती. २००१ मध्ये गोव्यात एसटींची संख्या ५६६ इतकी होती.

२००३ साली अनुसूचित जमातींच्या यादीत कुणबी, गावडा आणि वेळीप यांचा समावेश केल्यानंतर राज्यातील या समाजाच्या संख्येत बरीच वाढ झाली. राज्यात अनुसूचित जमातींची संख्या अनुसूचित जातींपेक्षा अधिक आहे. पण, एसटींसाठी जागा राखीव नसल्याने कलम ३३२ अंतर्गत मिळणाऱ्या आरक्षणापासून समाज वंचित असल्याचे विधेयकाच्या कारणांमध्ये म्हटले आहे.

लोकसभेत एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचे विधेयक मांडले जाणे, ही गोमंतकीयांसाठी निश्‍चित आनंदाची बाब आहे. एसटी समाजाची अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, ती मागणी पूर्ण होईल, अशी आशा आहे. लोकसभेत विधेयक सादर झाल्यानंतर ते राज्यसभेतही मंजूर होऊन अधिसूचित व्हावे, अशी आशा आहे.
गोविंद गावडे, मंत्री, कला व संस्कृती
एसटी समाजाची राजकीय आरक्षणाची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जात आहे. भाजप सरकारने समाजाला दिलेले आश्‍वासन पूर्ण होत आहे, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांचे आभार.
प्रकाश वेळीप, नेते, उटा संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT